पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यात संथपणा जाणवतो. , पुढे विदूषकाच्या हाताने देवयानी आपल्या पित्याला पत्रिका पाठ- विते. या नाटकातील शुक्राचार्यसुद्धा बोलावल्याप्रमाणे उपस्थित होतात. ते 'ईश्वरी सूत्रानुसार सगळे घडते, असा भाबडा, पोक्त विचार करीतच ! शुक्राचार्यांचा क्रोध येथे मात्र आढळत नाही. शर्मिष्ठा आणि ययाती दोघेही पुढे काय होणार या धास्तीने 'कांहि कळेना मम चित्ताला || अशा स्थितीत आहेत. पण अनपेक्षितपणे ययाती देवयानीच्या मंदिरात उपस्थित होतो आणि एक तीव्र संघर्ष येथे सौम्यरूप धारण करतो. ययाती - देवयानी यांचे संभाषण निर्जीव होते. जणू फारसे काही घडलेच नाही अशातऱ्हेने सखी रदनिकेच्या आश्रयाने देवयानी आपला कृतककोप व्यक्त करते. ययातीसुद्धा 'प्रिये, अशी मजवर रागावून वाकडेंच कां बरे बोलतेस ? ' असे पतिपत्नीच्या सहज भांडणासारखे बोलतो. सौभद्र नाटकाची छाप या नाटकातील पदावरही दिसते (उदा : 'नको धरू रागा । मजवरी करी अनुरागा ॥ धृ ॥ ) शेवटी ययाती शर्मिष्ठा दोघंही शरणागती पत्करतात आणि संघर्षावाचून नाटक घडते. 11 ययाती आणि देवयानी यांच्यात सख्य जुळते आणि नाटकाची रंगतच संपुष्टात येते. नाममात्र शुक्राचार्यांचे आगमन होते. सगळे त्यांच्या चरणी लागून आशीर्वाद घेतात. शापा ऐवजी वरदान मिळते. ('शुक्राचार्य - वत्सा ययाते' तुला आणखी कांही इच्छा असल्यास मागून घं. ' तात्पर्य, १८८९ साली केवळ मनोरंजक साहित्यकृती म्हणून श्रीखंडे यांनी ययाती उपाख्यानावर आधारित सं. ययाती नाटकाची उभारणी केली. रंजनासाठी महाभारतातील कथानकाचा वापर कशा ४६ .. 11 ययाति म्हणतो, 'कर जोडोनि प्रार्थितसें मी ॥, ' तर पश्चाताप - दग्धः शर्मिष्ठा म्हणते,- 'राग नसावा ह्या दासीवर मागतें हें तुज पसरूनि पदर । तव ताताच्या सहजचि नमतें होऊनि जाईल ही तनु चूर ॥

'सेवक मी तब पदाचा' म्हणून ययातीने येथे शुक्राचार्य येण्यापूर्वीच देवयानीला प्रसन्न करून घेतले आहे. सं. ययाती : वि. गो. श्रीखंडे, १८८९