पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिसे कां?' कारण तोही संपूर्णपणे तिच्यावर भाळला आहे. 'सखिचा ध्यास मला । निशिदीनों अंतरी लागुन गेला ॥' अशी त्याची स्थिती आहे. मीलनाची याचना किती लीन होऊन ययातीराजा करतो हे पाहिले म्हणजे तो राजा नसून प्रियकर, केवळ एक प्रियकर म्हणून येथे जाणवतो. 10 हे सगळेच वर्णन अपूर्व आहे. नाटककाराला ययाती उपाख्यानातील सारा संघर्ष बाजूला ठेवून येथे ययाती शर्मिष्ठा प्रेमकथाच रंगवावी असे वाटले आहे. महाभारतातील उपाख्यानाला व्यक्तिपरत्वे मिळालेले हे वळण आहे. नाटकाचे तीन अंक पूर्ण होऊनही शमिष्ठा, देवयानी यांच्यातील वैमनस्य कोठेही प्रगट होत नाही. यावरून नाटककाराचो ययाती उपा- ख्यानाकडे पाहण्याची, त्यातील फक्त हवे ते स्वीकारून त्याचाच आविष्कार करण्याची भूमिका स्पष्ट होते. येथे श्रीखंडे यांना प्रेमाचे सूत्र या उपाख्यानात सापडले असून त्या सूत्राच्या विस्तारातच त्यांनी नाटक रंगविले आहे. नाटयाचा अभाव : या नाटकाच्या चौथ्या अंकात मात्र देवयानीला ययातीचे चित्त विचलित झाल्याची जाणीव होते. अन्य मराठी साहित्यकृतीप्रमाणे नागिणीसारखी चवताळून फूत्कार टाकणारी देवयानी येथे नाही. ती आपली असहाय्यता, राग व्यक्त करते. स्वतःच्या नशिबाला दूषण देते. उलट तिची मैत्रीण सखी रदनिका तिला अशावेळी शुक्राचार्यांची मदत घ्यायला सुचविते. महाभारतातील नाट्यात्म कथेतून हे एक नाट्यहीन नाटक जन्मले याचे आश्चर्य वाटते. 10 कर जोडुनि मीनमुनि वदतों तव पादांशी ।। (पृ. ४७ ) यानंतर नाटकात कंसात चक्क नोंद आहे. ( ती येऊन बसते व ययाति तिचे चुंबन घेतो. ) सं. ययाती : वि. गो. श्रीखंडे (१८८९ ) अंक ३ पृ. ४८