पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तिने कटाक्षाने शर्मिष्ठेला दूर ठेवले असते. ययातीप्रमाणेच शर्मिष्ठाही त्याच्या मोहात पड़ते.. वारा घालतांना भूलून ती म्हणते, 'सुंदर नहुष - कुमारा । मदनाहुनीही अति सुकुमरा । पाहुनि राजीवनयना विसरुनि गेले मी तनु भाना || 'मुळीं सम नशिबचि फुटकें' अशी जाणीवही तिला येथे होते. ही शर्मिष्ठा सुद्धा ययातीप्रमाणेच कामातुर प्रणयिनी आहे # शृंगाराच्या, विप्रलंभ शृंगाररसाच्या निर्मितीसाठी नाटककराने शमि- ष्ठेच्या विरहज्वराचे दुःख उत्कटतेने चित्रित केले आहे. 'मम नाथाची मदन मूर्ति ती' या शृंगारिक भाषेत ती बोलू लागते. मदनिकेजवळ ती आपली व्यथा सांगते तेव्हा 'हंस नेहमी मुक्ताफळेंच भक्षितो' या तिच्या उत्तरात ययाती शर्मिष्ठा प्रेम पूर्णपणे प्रकट झाले आहे. अद्भुतरम्यतेचा आधार :- शर्मिष्ठा ययातीवर प्रेम करीत असूनही तिचे मन कातर आहे. पण श्रीखंडे यांनी एका अद्भुतरम्य प्रसंगाचा आधार घेऊन रंजनाबरो बरच शमिष्ठेच्या मनातील कातरता दूर केली आहे. चित्रासुराच्या मदतीने एकांतात शर्मिष्ठा आणि ययाती या दोघांना एकाच मंचकावरती आणून त्यांचे परस्परांविषयीचे प्रेम व्यक्त केले आहे. या प्रसंगाने अण्णा- साहेब किर्लोस्करांच्या 'सौभद्र' मधील घटोत्कचाच्या कामगिरीती आठवण होते. हा प्रसंग कपोलकल्पित आहे. नाटककाराने या प्रसंगाच्या चित्रणाने प्रणयरंगाला उधाण आणले आहे. f ४४,.. ययातीलाही प्रारंभी अशीच भीती वाटते. 'तिजला हा वर योग्य 9 'परमेश्वरा! बरोबर ज्या तरुणीला ही सौंदर्याची खाण सापडेल तीच युवती धन्य हृयांत बिलकुल संशय नाही. ' 'ते दिवशी देवयानीच्या महालात त्या प्राणेश्वरास पहिल्यापासून त्यांचा 4 मला अगदी निजध्यास लागून गेला आहे कुठेही मन रमत नाही. ' नाथ मूर्तिरुचिर अति मर्जाशि दिसली । पाहुनि ती संग स्पृहा मनिच उपजली || 1 ' चैन नसे मज प्रिय विरहाने । डाव साधला निष्ठुर मदनें ।। काय करू सखे मज करमेना. 1 सं. ययाती : वि. गो. श्रीखंडे, १८८९ (अंक २, प्र. ३ पू. २९)