पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

73 शर्मिष्ठेला आपल्याबरोबर दासी म्हणून विवाहानंतर येण्याचे फर्मावतें, ' 'देवयानी'च्या या म्हणण्याला शुक्राचार्य येथे मान तुकवितात आणि कन्येच्या इच्छेला सामोरे जातात. 9 कथानकातील सारे नाट्य हरपते व संघर्ष येथे कोठेच आढळत नाही. मिळमिळीत तडजोड येथे आहे. पण नाट्याचा अभाव असला तरी कलामूल्यांची जाण नाटककाराला आहे असे जाणवते. प्रणयिनी शर्मिष्ठा :- राजकन्या असूनही दासी म्हणून जीवन जगणाऱ्या शर्मिष्ठेला पाय दाबण्याचे कामही करावे लागते. 'मम जन्म फुकटच गेला थोर कुली जन्मुनी ।' असे म्हणायची पाळी, तिच्यावर येते. ययातीने विचारताच या नाटकातील देवयानी शर्मिष्ठेचा एक राजकन्या म्हणून येथे सरळ परिचय करून देते. 'सर्व दैत्यांचा अधिपति जो वृषपर्वा त्याची ही कन्या ! 1 या ठिकाणी नाटककार रंजनाच्या दृष्टीने कथावस्तूंचा आवि- ष्कार करतो. स्वगतात कामातुर ययाती शर्मिष्ठेच्या लावण्याची स्तुती करू लागती. ययाती आपण थकल्याचे खोटे भासवितो. या थापेला देवयानी बळी पडते. स्वतः पाय दाबते व शर्मिष्ठेला त्याला वारा घालायला सांगते. मत्सरी, अहंकारी, देवयानी येथे कोठेही आढळत नाही. नाहीतर 7 1 'बाबा, आपणांला माझें एवढेच सांगणें आहे की त्या विहिरीतून मला वर माझा काढण्याकरितां ज्यांनी माझे पाणिग्रहण केलें त्यांनाच मी हा माझा देह अर्पण केला आहे. या करितां माझ्या दास्यत्वाला शर्मिष्ठा देऊन जर तुम्ही माझी तिकडे पाठवणी करीत असाल तरच मी आतां आपल्याबरो- बर येतें, नाही तर मला काही बिलकूल यायचें नाही.' सं. ययाती : वि. गो. श्रीखंडे : १८८९ अंक १ पृ. १५ 8 'प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचेही मी ऐकत नाही तर वृषपर्व्वाने माझे ऐकलेच पाहिजे.' सं. ययाती : वि. गो. श्रीखंडे, १८८९१ पृ. १६ J ..४३