पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काळात एक समर्थ, अभिनव साहित्यकृती म्हणून या नाटकाचा गौरव झाला असता. शुक्राचार्यांचा अपत्यस्नेह ही खरी महाभारतातून सूचित होणारी एक व्यथा आहे. नाट्याचार्य खाडिलकरांनी याचा पुरेपूर उपयोग 'विद्याहरणा'त करुन घेतला आहे. तेवढ्यासाठी शुक्राचार्य कचाचा डाव ओळखूनही त्याला आश्रमात ठेवून घेतात. मारला तरी पुन्हा जिवंत करतात कारण देवयानीचे जीवनसर्वस्व 'कच' आहे. आणि शुक्रा- चार्यांची लाडकी एकुलती एक कन्या 'देवयानी' आहे. श्रीखंडे यांनी शुक्राचार्यांच्या अपत्यस्नेहाची ही व्यथा अचूकपणे टिपली आहे. 'बाला- विन दुसरें नाही विश्रांतिस्थल पितरांना ॥' लाडक्या लेकीसाठी, हळव्या झालेल्या पित्याची ही मनःस्थिती ( २ प्या प्रवेशात ) शुक्राचार्य जेव्हा देवयानीचा शोध घेतात, तेव्हा स्पष्ट होते. लेखकाच्या व्यक्तित्वानुसार आणि कल्पनेनुसार पुराणकथा वळण घेतांना येथे दिसते. जलक्रीडेला गेल्या असतांना शर्मिष्ठा व देवयानी यांच्यात वस्त्रांच्या अदलाबदलीवरून भांडण होते. त्यात शर्मिष्ठा कठोरपणे देवयानीला विहिरीत ढकलून देते. तसेच निर्जन अरण्यात तिला सोडून नगरात परत येते. शर्मिष्ठेच्या या दुष्कृत्याविषयी व पाषाणहृयी होऊन वागण्याविषयी दोष देऊन निदान या प्रसंगी तरी देवयानीला सहानुभूती दाखवायला हवी होती. पण मराठी ललित साहित्यात या गोष्टीचे फारसे चितन झाले नाही. याही नाटककाराने थोरांची एक खोडी, ( राजकन्येचा एक खेळ ) म्हणून या घटनेकडे, देवयानीने दुर्लक्ष करावे असे येथे सांगितले आहे. नाटककाराची स्वतंत्र जाणीव यातून सूचित होते. 'अगं, लहान लहान अज्ञानमुले अशीच अविचाराने भांडतात व लाग- लीच एकही होतात. ' प्रौढ माणसाने मुलांची समजूत काढावी असाच हा प्रकार आहे. हा शुक्राचार्यांचा समजूत काढण्याचा प्रयत्न दुबळा आहे. ग. त्र्यं. माडखोलकरांच्या 'देवयानी' नाटकातील घटनेप्रमाणे या गोष्टीचा निवाडा येथे वृषपर्व्याच्या राजदरबारात होत नाही. देवयानी ४२ ..