पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बालनाट्याचें अद्भुतरम्य स्वरूप प्राप्त करून दिले आहे. ते उपाख्यान आपल्याला हव्या त्या पद्धतीने वापरतात, त्यात घटनाप्रसंगांची चम- कृतीसाठी स्वैर निर्मिती करतात. रंजनाची प्रेरणा या नाटकाला व्यापून टाकते. पुढे हेमकूट पर्वतावरील गुहेत देवयानीला ठेवल्याचे लक्षात येते पण तेथूनही ती अदृश्य होते. शेवटी ती शंकराच्या देवळात सापडते. शेवटी इंद्र क्षमा मागतो आणि ययाती देवयानीची भेट होते. केवळ नावालाच महाभारतातील उपाख्यानाचा आधार घेऊन रंजनाचा मसाला भाबड्या स्वरूपात आणि मुक्तपणाने भरण्याचा प्रयत्न येथे श्री. भि. ग. आठवले यांनी आपल्या काळाची अभिरुची लक्षात घेऊन केलेला दिसतो. वि. गो. श्रीखंडे यांचे सं. ययाती :- वि. गो. श्रीखंडे यांचे 'संगीत ययाती' हे पाच अंकी नाटक ययाती उपाख्यानावर लिहिलेले आहे या नाटकाचे सूत्र आणि भूमिका प्रारंभीच सूत्रधार आपल्या मंगलाचरणातून व नटीबरोबरच्या संभा- षणातून स्पष्ट करतो ययातीचे चरित्र सांगणे ही कल्पना येथे गृहीत आहे.' देवयानी व शर्मिष्ठा यांची ही कथा असून शुक्राचार्यांचा कन्या- मोह, धृतराष्ट्र व द्रोणाचार्यांना त्यांचा अपत्यस्नेह नडला, तसाच येथेही नडला आहे. अपत्यस्नेह :- नाटककाराने महाभारतीय उपाख्यानातून शोधलेले हे अपत्य- स्नेहाचे सूत्र जर पुढे संपूर्ण नाटकभर सांभाळले असते तर प्रारंभीच्या 6 'पुरुकुली जनित ययाति नृपति गमला महीवर रविवत जाणा । तच्चरित्र सुमना विठ्ठल अर्पित रसिक सभा जन चरणा ॥ 3 'लालन योगें बाल बिघडुनी कलंक ये जनकाला || देवयानिने जेविं आणिला त्रिभुवन पूज्य पित्याला ॥ म्हणून वदत तुला | लाडान करी कधि बाला ॥ (नटी सूत्रधार प्रवेशातून ) सं. ययाती : वि. गो. श्रीखंडे, १८८९ पू. २ .४१