पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सूचकतेने उपयोग या काल्पनिक प्रसंगात केला आहे. अपराधी शर्मिष्ठेने - घटलेल्या अरिष्टाला टाळण्यासाठी शोधलेली ही युक्ती मार्मिक आहे. शेवटी ययाती शुक्राचार्यांना घेऊन देवयानीकडे वनात येतो. पण देवयानी शोधूनही सापडत नाही. औत्सुक आणि चमत्कृतीचा खेळ येथे नाटककाराला करावासा वाटतो. भडक कपटनाट्य योजून आठवले यांनी शुक्राचार्यांच्या अंतःकरणातील अपत्यस्नेहाची अत्युत्कट भावना चित्रित केली आहे. रहस्यमयतेने अदृश्य झालेल्या देवयानीचा शोध. शुक्राचार्य अंतर्ज्ञानाने घेतात. तेंव्हा घडलेला प्रकार उलगडतो. हा सगळाव भाग कपोलकल्पित आणि चमत्कृतिजनक असून भावाविष्कारासाठी व प्रेक्षकांचे कुतूहल जागृत करण्यासाठीच केवळ योजलेला दिसतो. हे नाटक म्हणजे महाभारताची कथा रंजनासाठी आणि स्वैरकल्पना विलासासाठी कशी राबविली जाते याचा वस्तुपाठच होत. इ. स. १८९६ मधील नाटक म्हणून विचार केल्यास त्याच्या अद्भुतरम्य स्वरूपाचा उलगडा होतो. ययाती 'विलाप ' -: हरवलेल्या देवयानीविषयी ययातीच्या मनात नाना प्रकारच्या शंकाकुशंका येऊन तो शोकविव्हल होतो. या प्रसंगीचा ययातीचा विलाप रघुवंशातील अंज, रामायणातील सीताहरणानंतरचा राम किंवा मेघ- दूतातील यक्ष, यांनी केलेल्या शोकाचे स्मरण करून देतो. हा ययाती मेघाला बक्षिसाचे आमिष दाखवितो, त्याला कोकिलकूजित म्हणजे देवयानी बद्दलची असूया वाटते. हंसाला तो 'मृगनयना' देवयानी आढळली का म्हणून विचारतो. अशा तन्हेने भि. ग. आठवले यांनी संपूर्ण पाचवा अंक देवयानीच्या शोधासाठी खर्ची घातला आहे. हे सारेच अतिरेकी, भावविवश नाट्य आहे. या अतिरेकामुळे रस निर्मितीएवजी रसहानीच झाली आहे. सर्व गोष्टींच्या मुळाशी कारण असलेल्या इंद्रानेच 'सुशर्मा' नावाच्या गंधर्वामार्फत हे सारे घडवून आणल्याचे शेवटी सिद्ध होते. त्याचा हेतू 'माझ्या या करामतीपासून शुक्र व दैत्येंद्र या दोघांमध्ये अत्यंत विरोध उत्पन्न होईल.' (पृ. १५७) हा स्पष्ट होतो. ४०... श्री. आठवले यांनी महाभारतातील ययाती उपाख्यानाला एखाद्या