पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नवी कलाटणी -- ययाती देवयानी यांचा हा विवाह म्हणजे ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा संगम आहे. 'ब्राह्मणाची वस्तू इतरांना असेव्य' असे ययाती, देवयानीला म्हणतो तेव्हा देवयानी काकुळतीला येऊन म्हणते, हे सारे भेद मी मोडण्यास तयार असून त्यासाठी पित्याची आज्ञा मिळवीन. ' येथे नाटककाराने आपल्या स्वतःच्या कालखंडात रूढ असलेल्या भेदा- भेदाची कल्पना पुराणकाळावर आरोपित करून एक वेगळी कलाटणी ययाती देवयानीच्या विवाहाच्या प्रसंगाला दिली आहे. देवयानीचा वाजवीपेक्षा अधिक जिद्दी स्वभाव येथे वर्णन केला आहे. शर्मिष्ठेला शासन केल्याशिवाय घरी परतावयाचे नाही अशी तिची प्रतिज्ञा आहे. शेवटी शुक्राचार्यांनाही निरोप पाठविण्याची जबाबदारी ययाती स्वीकारतो. या प्रसंगाचीही स्वतंत्र निर्मिती आहे. त्यात कमालीची अद्भुतरम्यता आहे. या प्रसंगाला महाभारताचा आधार नाही. देवयानी वनात एकटीच राहणार या कल्पनेने तिचे संरक्षण करू शकेल असा 'वर' ययाती, जातांना तिला देतो. या एका छोटयाशा प्रसंगाच्या निमित्ताने विरहाच्या भावनेचा आविष्कार आणि विप्रलंभ शृंगाररसाच्या निर्मितीचा प्रयत्न येथे नाटककार करतो. तो कोणताही कलात्मक परिणाम साधीत नाही. उलट हास्यापद ठरतो. 'विरह कसा साहू ? ' अशा भावोत्कट मनःस्थितीत ही देवयानी वनात राहते. देवयानी घरी परत आली नाही म्हणून शुक्राचार्यांची आणि त्यांच्या पत्नीची अवस्था शोकाकुल झाली आहे एवढे महान तपस्वी शुक्राचार्य, पण ते आपल्या एकुलत्या एक लाडक्या कन्येच्या विरहाने व्याकुळ होतात. या भावनेला गहिराई प्राप्त करून देणारे चित्रण, 'देवयानीच्या विरहाने मूच्छित झालेल्या तिच्या आईच्या वर्णनाने आले आहे. अस्वस्थ झालेले देवयानीचे आईवडील शर्मिष्ठेची दासी मंदाकिनी हिच्याकडे देवयानीच्या चौकशीसाठी जातात. तेव्हा मंदाकिनी शर्मिष्ठा तापाने फणफणत असून बडबडते आहे असे खोदे बनावाप्रमाणे सांगते. पण शर्मिष्ठेच्या या बनावाचा, बडबडण्याचा नाटककाराने मोठया ..३९