पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असून सगळ्या कलहाच्या मुळाशी तोच आहे हे स्पष्ट केले आहे. वादळाच्या निर्मितीमुळे वस्त्रात अदलाबदल होते. देवयानी आणि शर्मिष्ठा यांच्यात कडाक्याचे भांडण होते (पृ. ८४ ) शर्मिष्ठेने केलेली भयंकर निंदा सहन न होऊन देवयानी मूच्छित पडते. ती वारली असे समजून सगळे तेथून पळ काढतात. या अतिशयोक्त वर्णनातून भावनेचा आणि प्रसंगचित्रणाचा प्रकर्ष साधण्याचा अयशस्वी प्रयत्न दिसतो. 'अनेक भोगांगनांशी व विवाहित वधूंशी रममाण होणारा सार्वभौम राजा' ययाती, देवयानीचा शोध घेत असतांना कोणीतरी एक कृत्रिम पुरुष त्याला एक पत्र देतो. पण तो पिशाच्च हे घडवतो या कल्पनेने ययाती वन जाळू इच्छितो एवढ्यात 'तुझी मनो विहारा वेल्हाळी ' तुला येथे भेटेल अशी आकाशवाणी होते. आवाजाच्या दिशेने ययाती वेध घेतो तेव्हा त्याला देवयानी कूपात पडलेली सापडते. ती कूपात असतांनाच परस्पर परिचय करून घेतला जातो. या परिचयानंतर उजवा हात धरून ययाती देवयानीला वर काढतो. यावेळी अंतरिक्षातून पुष्पवृष्टी होते. या प्रसंगाचे चित्रण लेखकाच्या युगाचा धर्म म्हणता येईल असेच आहे. 'पंकिच ही रुतली गाय, , मुक्तिच दिधली तिला ' पंकात रुतलेल्या गायीची प्रतिमा संकटात सापडलेल्या स्त्रीसाठी वापरण्याचा प्रघात मराठी साहि त्यात आढळतो. देवलांची 'शारदा' खाडिलकरांच्या कीचकवधातील 'सैरंध्री' असाच हंबरडा फोडते. उच्चनीचत्वाच्या कल्पनाही येथे ओघात मांडल्या आहेत. देवयानीला ययाती अभय देतो पण या विवाहाच्या निमित्ताने नाटककाराला एक नवा सामाजिक प्रश्न विचारात घ्यावासा वाटतो. ३८...

  • देवयानी शर्मिष्ठेविषयी ययातीजवळ उद्गार काढते 'वृषपर्वा हा माझ्या बापाचा शिष्य, तेव्हा त्याची कन्या, माझी शिष्या, ती निशाचरकन्या तेव्हा माझी वस्तू तिला सेवन करण्याचा अधिकार नाही. '

सं. देवयानी पाणिग्रहण नाटक : भि. ग. आठवले, पृ. ११० ● 'सोड सखी तू काळजी | घेऊ सुडा अथवा आणवू बांधून तिचा काय जी ॥ १ ॥ सं. देवयानी पाणिग्रहण नाटक : (नाटकातील पद )