पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

1 आहे. ' शृंगार आणि करुणरसनिर्मिती लेखकाला येथे अभिप्रेत आहे.* : नाट्यापेक्षा पद्यमय संगीतकासारखेच स्वरूप या नाटकाचे आहे. संघर्षाला येथे अवसर मिळत नाही. दुसऱ्या अंकात कचाने संजीवनी विद्या संपादन केल्याचा उल्लेख आहे. नावावरून या नाटकाचा प्रतिपाद्य विषय 'शुक्र- कन्यादेवयानी हिचा ययाती राजाशी विवाह' (पृ. ४१ ) हा आहे. 3 या नाटकात देवयानीच्या विरहिणीच्या स्थितीला विशेष अवसर मिळालेला आहे. नाटककाराने तिची ही विरहिणीची अवस्था मोठी समरसून वर्णन केली आहे. कल्पकतेला पुरेपूर वाव येथे मिळाला आहे. उदाहरण म्हणून देवयानीच्या झोपेतील बडबडण्याचा उल्लेख करता येईल. ही अतिरंजित वर्णने आहेत. स्वैर कल्पनाविलास :- शिकारीच्या निमित्ताने बाहेर पडलेल्या ययातीला देवयानी भेटते. ते दोघे परस्परांवर अनुरक्त होतात. शर्मिष्ठाही ययातीवर लुब्ध होते. नाटककाराने हे अद्भुतरम्य वातावरणाने युक्त कथानक स्वतःच्या कल्पकतेने पुढे रंगविले आहे. महाभारतापासून ही कथा स्वतंत्र बनते. येथे शर्मिष्ठा आणि देवयानी यांच्या जलविहाराचे विस्तृत चित्रण शृंगाररसाच्या निर्मितीसाठी येते. (पृ. ७५) देवयानी आणि शर्मिष्ठा यांच्या नेसावयाच्या वस्त्रातील हे बदलाचे असे सुरम्य व रंगतदार वर्णन याच नाटकात आढळते. देवेंद्राच्या व्यक्तिरेखेला या नाटकात स्थान दिले 1 ' स्वकपोलकल्पित नवीन नवीन संविधान के बसवून त्यांजवर अशा प्रका- रची रचना करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तो आपल्या पौराणिक कथांवर केला असता अधिक श्रेयस्कर होईल असे माझे तर मत आहे. ' (प्रस्तावना: पु. १ ) 2 ' देवयानि पाणिग्रहणाख्यचि नाटक रसि शुचि कारुण्यी ॥ 2 गणेशसूते रचिले ....... (पृ. ४) 5 'सं. देवयानी पाणिग्रहण नाटक ' : भि. ग. आठवले (१८९६ ) (पृ. ६३-६४ ) •.३७.