पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जीवनव्यवहाराचे सखोल दर्शन वडते. शुक्राचार्यांच्या शाप व उःशापाने कथानकातील नाट्य तीव्र बनते. म्हणून या उपाख्यानाचे मराठी प्रतिभेला विशेष आकर्षण आहे. १९५९ साली प्रसिद्ध झालेल्या ययाती कादंबरीने सान्या मराठी रसिकांचे लक्ष ययाती उपाख्यानाच्या रगतदार कथानकाकडे खेचून घेतले आहे. यताती आणि शर्मिष्ठेच्या उदात्त व उत्कट प्रेमाला या कथेत प्राधान्य मिळाले आहे. येथे देवयानी, शर्मिष्ठा यांच्या स्वभावातील आणि आचरणातील दोष जाणवतात. या कथानकात देवयानी आणि शर्मिष्ठा, कच आणि ययाती या व्यक्तिरेखा समसमांतर असून, त्या परस्परांच्या गुणदोषांवर प्रकाश टाकतात. सवतीमत्सराची भावना येथे मानवी पातळीवरून व्यक्त होते. खऱ्या प्रेमाची पुरुषाला असलेली तहान ययातीच्या रूपात पहायला मिळते. शुक्राचार्यांच्या रूपात जीवनातील भयानक तपश्चर्येची उग्रता जाणवते. ययातीला मिळणाऱ्या शापात कारुण्य आहे. कामी माणसाच्या जीवनाची शोकांतिका त्याला मिळालेल्या वार्धक्याच्या शापापेक्षा भयानक असू शकत नाही. ययातीचे वार्धक्य ही त्याच्या शोकाची परिसीमा आहे. कचाच्या उदात्त व्यक्तिमत्त्वाने संयमाचे जीवनातील महत्त्व येथे स्पष्ट होते. पुरूच्या महान त्यागाला तुलना नाही. या उपाख्यानात हे जे मानवी स्वभावाचे अनेकविध पैल आपल्यासमोर उलगडले जातात आणि जीवनाचे अत्यंत सखोल व मार्मिक दर्शन घडते, त्यामुळेच साहित्यिकांना या कथानकाचे लालित्यपूर्ण निर्मितीसाठी फार मोठे आकर्षण आहे. आठवले, श्रीखंडे, माडखोलकर, वि. स. खांडेकर, शिरवाडकर, पाडगावकर, शेंडे या साहित्यिकांनी आपल्या दृष्टीकोनातून या कथानकाला साकार केले आहे. नव्याने या कथेचा समर्थ आविष्कार केला आहे. 'सं. देवयानी पाणिग्रहण नाटक' :- श्री. भि. ग. आठवले यांनी आपण या कथानकाकडे का वळलो हे प्रस्तावनेत सांगितले आहे. 'हे कथानक सुरस असून संस्कृत भाषेत नाट्य रचना नाही.' 'जलपयन्यायाने' त्यांनी या कथानकाची निवड केली ३६...