पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ययाती उपाख्यानातील व्यक्तिचित्रे ययाती उपाख्यानातील व्यक्तिचित्रे :- कचोपाख्यानात कचाने संजीवनी विद्याहरण केली हा कथाभाग आला आहे. ययाती देवयानीचे पाणिग्रहण करतो या कथाभागापासून ययाती उपाख्यान सुरू होते. कचोपाख्यानापेक्षा ययाती उपाख्यान मराठी ललित साहित्यात अधिक प्रभावीपणे चित्रित झाले आहे. त्याची रंगत अधिकच वाढली आहे. या उपाख्यानाला रसिकप्रिय करण्यात वि. स. खांडेकर यांच्या 'ययाति' कादंबरीचा निर्विवादपणे सिंहाचा वाटा आहे. अर्थात 'ययाति' कादंबरीच्या निर्मितीपूर्वीही या उपाख्यानावर आधारित साहित्यकृती निर्माण झाल्या आहेत. अर्वाचीन मराठी साहित्यातील पौराणिक नाटकांच्या युगात या कथाभागावर आधारित नाटके लिहिलेली आढळतात. ययाती उपाख्यानात ययाती. देवयानी, शर्मिष्ठा, शुक्राचार्य, पुरू या व्यक्तिचित्रांना महत्त्वाचे स्थान लाभते. ययाती व देवयानी यांच्या विवाहानंतर शर्मिष्ठा दासी म्हणून तिच्याबरोबर जाते आणि पेचप्रसंग - निर्माण होतो. ययाती, शर्मिष्ठा परस्परांच्या अधिक जवळ येतात. आणि उत्कट प्रेम करू लागतात. त्यामुळे देवयानीची शर्मिष्ठेविषयीची सूडाची भावना अधिकच तीव्र बनते. तिच्या तिरस्काराला शर्मिष्ठा आणि ययाती दोघांनाही सामोरे जावे लागते. यातून पुढील नाट्यमय कथानक जन्मते. शुक्राचार्यांच्या आधाराने देवयानी स्वतःच्या अहंकाराला धक्का लागू देत नाही. उलट आपल्या अहंकाराला ती जपते अधिकच फुलविते. त्यामुळे ययातीपासून आणखी दूर जाते. तिच्या सूडाच्या भावनेचा भडका उडतो. या कथानकात स्त्रीच्या स्वभावाचे, पुरुषीवृत्तीचे आणि एकूण . ३५