पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वगृही सुखरूप परतणारा संयमी निष्कलंक, ब्रह्मचारी तरूण कचदेव देवराष्ट्रालाच काय कोणत्याही उदयोन्मुख राष्ट्राला साक्षात देव अवतरला वाटणे साहजिक आहे. असल्या प्रवीण स्वार्थत्यागी ध्येयनिष्ठ विद्याधरांची अत्यंत आवश्यकता आज आपल्या भारतवर्षाला किती महत्त्वाची आहे, हैं स्वतः सिद्ध आहे. आणि याचमुळे हे उज्ज्वल कचदेव चरित्र भारतीय नवतरुणांपुढे आदर्श म्हणून मी नवकाव्यरूपाने मुद्दाम आणीत आहे, "43 कचोपाख्यानाचे मराठी अवतार :- एकूण मराठी ललित साहित्यात अवतरलेल्या कचोपाख्यानाचे स्वरूप पाहता त्यात खाडिलकरांचे 'विद्याहरण' नाटक वगळता फारसे विशेष लक्षणीयत्त्व निर्माण झाले नाही. रंजनाच्या आणि प्रबोधनाच्या, त्यातही प्रामुख्याने उद्बोधनाच्याच प्रेरणेने या संजीवनी विद्याहरणा- पर्यंतच्या उपाख्यानातील कथाभागाचे आविष्करण मराठी ललित साहित्यात झाले आहे. अव्वल इंग्रजी कालखंड आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध म्हणजे १८५० ते १९२५ या कालखंडात ही कथा विशेष लेखक वाचकप्रिय होती असे दिसून येते. महाभारतातील कच व देवयानी यांच्या व्यक्तिरेखा मात्र कुतू- हलाचा आणि जिज्ञासेचा विषय बनल्याचे आढळते. शिवाय त्यात स्वतंत्र रंग प्रत्येक साहित्यिकांने आपल्या विविध हेतूंनी भरल्याचे आढळते. कचदेवयानी प्रेमाचे विविध तऱ्हेचे आविष्कार व प्रतिपादन या लेखनात दिसते. पुढे ययाती उपाख्यान विशेष लोकप्रिय झाले त्याची बीजे या कचोपाख्यानावरील मराठी ललित साहित्य निर्मितीत दिसतात. 1 = ३४

43 श्री. संजीवनीहरण काव्य : वि. गो. साठये, १९४८ ( नमस्ते : पू. ११)