पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विद्यासंपन्न व बलसंपन्न करावे व भारतमातेची दास्यशृंखला तोडून तिला स्वतंत्र करावे असे कवीला वाटते. 'कच' विद्यार्थी म्हणून कवीने विचित्र केला आहे. त्याचें व्रतस्थ विद्यार्थी जीवन कवीच्या आकर्षणाचे व चितनाचे केंद्र बनले आहे. प्रबोधनाच्या प्रभावी प्रेरणेने हे काव्य भारलेले आहे. धर्माभिमान, राष्ट्रभिमान व पारतंत्र्याविषयी वाचकांच्या मनात चीड निर्माण व्हावी, मद्यपान निषिद्ध मानले जाणे इत्यादी गोष्टींचे प्रतिपादन अनुषंगिक रीतीने आले आहे. स्वातंत्र्य संपादनाची शिकवण ध्वनित करणारे हे काव्य स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रसिद्ध झाल्याने त्याचा गौरव अपेक्षेप्रमाणे होऊ शकला नाही. अन्यथा आगरकर-टिळकांच्या- खाडिलकरांच्या युगात याही काव्याचा उचित गौरव झाला असता असे त्यातील आशयाकडे पाहून म्हणता येते. आदर्श विद्यार्थी रेखाटण्याची कवीची प्रेरणा उदात्त असूनही हे चितन काव्यानुभवाचा अपरिहार्य भाग नत नाही, त्यामुळे या काव्यातील विचारांना स्वतंत्र मोल प्राप्त होते. हे खंडकाव्य म्हणजे महाभारताच्या उपाख्यानाचा उद्बोधनासाठी वापर कसा केला गेला याचे एक उत्तम उदाहरण आहे. + श्री. वि. गो. साठच्या भावविश्वातील 'कच :- श्री. वि. गो. साठे यांनी ज्या वैचारिक भूमिकेतून कचाकडे पाहिले आहे ती भूमिका त्यांनी प्रस्तावनेत मांडली आहे. त्याआधारे कवीच्या भावविश्वातील कचाचे चित्र स्पष्ट होते. " निःसीम स्वराष्ट्रभक्ती व तिच्यापायी पराकाष्ठेचा स्वार्थत्याग हे या कचदेवाचे मोठे गुण-विशेष आहेत. अभिनव विद्यार्जनासाठी शत्रु- राष्ट्रांतही साहसपूर्वक कुशलपणे प्रवेशून तेथे वर्षानुवर्षे सावधान राहतांना tar-सुलभ प्रणयादि दुर्दम्य भावनांना स्वतः मुळीच बळी न पडतां उप- स्थित मोह कारणांचाच उपयोग उलट आपल्याच कार्यसिद्धीकडे चतुराईने करून घेणारा प्राणपणाने जोडलेल्या दुर्लभ स्पृहणीय विद्येची विजय पताका मनोभावानें मातृभूमीच्या पदीं वाहून स्वबांधवाच्या उद्धारासाठी be ३३.