पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मनावर झालेले असल्याने, एका ध्येयवादी कविमनाचा आविष्कार म्हणून या खंडकाव्यावरही त्याचा प्रभाव उमटला आहे. काव्याला जोडलेल्या 'नमस्ते' नामक प्रस्तावनेत ते म्हणतात 'केवळ स्वराष्ट्रोद्धारा- साठी संजीवनीहरण हेंच आमच्या कचाचें एकमेव निर्मल ध्येय आहे. ' निःसीम राष्ट्रभक्ती पराकाष्ठेचा स्वार्थत्याग, निष्कलंक ब्रह्मचारी व आदर्श विद्यार्थी या गुणांनी युक्त असे उज्ज्वल कचदेवचरित्र त्यांना भारतीय नवतरुणांच्या पुढे आदर्श म्हणून ठेवावयाचे होते पण हे काव्य बन्याच उशिरा सन १९४८ मध्ये प्रकाशात आले. या संजीवनीहरण खंडकाव्यांच्या इतिहासावरून उद्बोधनाच्या हेतूने कचोपाख्यानावर आधारित खंडकाव्य निर्मितीचा हा प्रयत्न आहे हे स्पष्ट होते. संजीवनीहरण' या खंडकाव्यात 'कच' हाच कवीने केंद्रबिंदू मानला आहे. तो नि:स्वार्थी, राष्ट्रभक्त, आदर्श विद्यार्थी आहे. आज अनेक भारतीय तरुण विद्यार्जनासाठी पाश्चात देशात जातात. त्यांच्यापुढे कवीने तारुण्यसुलभ मोहाला बळी न जाणारा प्रसंगी प्राणपणाला लावून विद्यार्जन करणारा व शत्रुराष्ट्रांत राहून स्वकीयांच्या उद्धारासाठी संजीवनी विद्याहरण करणारा कचदेव हा आदर्श ठेवला आहे. त्यासाठी त्यांनी महाभारतातील कचोपाख्यान निवडले आहे. राष्ट्रीयवृत्तीच्या आदर्श विद्यार्थ्यांचे चित्र कचाच्या रूपात त्यांना आविष्कृत करावयाचे होते. कचाकडे एक देवदानव युद्धकालाचा प्रतिनिधी म्हणून केवळ न पाहता त्यांनी त्याला विद्यार्थी म्हणून प्रतीकरूप आदर्श म्हणून घडविला आहे. प्रबोधनाची प्रेरणा :- कचोपाख्यानात कच सर्वस्व पणाला लावून विद्या हस्तगत करतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करतो. कचाप्रमाणेच आधुनिक कालांत अनेक भारतीय तरुण परदेशी जावेत. तेथे त्यांनी इतर सर्व मोह' टाळावेत, अर्वाचीन काळातील शस्त्रास्त्रांची विद्या संपादन करावी व भारतमातेच्या सेवेसाठी त्यांनी परत भारतात यावे. त्यांनी आपले राष्ट्र ३२...