पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जिद्दी कत्र येथे लक्षात राहतो. 'आपण सहोदर आहोत- सहोदरच काय ? दोन वेळा जन्म देऊन तूं माझी माता झालीस.' असा भलताच तर्क वरेरकरांचा कच लढवितो. शेवटी दोघेही परस्परांना महाभारतातील कथेप्रमाणे शाप, वर देऊन अलग होतात. ही वरेरकरांची संजीवनी - हरणाची कथा महाभारतीय उपा- ख्यानाला वेगळेच वळण लावते म्हणजे वरेरकरांच्या अपेक्षेनुसार रचलेली ही एक नवी पुराणकथा होते. . 'तुला माझी विस्मृती होईल अन् तुझ्या आजच्या वृत्तीला शोभणाऱ्या क्षत्रियाचं तूं पाणिग्रहण करशील 41 असा उमद्या मनाने कच येथे वर देतो. अनेकांनी अनेक तन्हांनी या उपाख्यानाकडे पाहिले आहे. कचदेवयानी हा समास येथे तोडण्याचा वरेरकरांनी प्रयत्न असला तरी इतरांनी कचदेवयानी प्रेम अभग. चिरंतन रूजलेले म्हणून वर्णिले आहे. या उपाख्यानाला प्रणयरंगाच्या रंगतीपेक्षा कठोर ध्येय आणि कर्तव्य निष्ठेचेच बळ लाभले आहे. व्यक्तिपरत्वे महाभारताकडे पाहतांना पडणारा फरक म्हणून हे जरी मान्य केले तरी महाभारताला या विविध दृष्टीकोनातून पाहिल्याने अनेक नवे धुमारे फुटल्याचे लक्षात येते ही वस्तुस्थिती आहे. श्री. संजीवनीहरण : राष्ट्रभक्त 'कच' :- खाडिलकरांच्या नाटकांप्रमाणेच तत्कालीन समाजातील ज्वलंत प्रश्न प्रतिपादण्याचा प्रयत्न अर्वाचीन कालखंडात पौराणिक काव्ये लिहिणान्या कवीपैकी वि. गो. साठ्ये यांनी 'श्री. संजीवनीहरण ** या काव्यात केला आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेतील निबंधांचे आणि लोकमान्य टिळकांचे 'गीतारहस्य' या ग्रंथाचे सखोल संस्कार त्यांच्या 41 सं. संजीवनी : वरेरकर (१९६०) अंक ३ पृ. ९७ +2 अर्वाचीन मराठीतील खंडकाव्ये : डॉ. ह. कि. तोडमल ( आ. दु. १९७४) पु. १९०-१९१ .३१