पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कचावर प्रथम दर्शनीच मुग्ध होऊन देवयानी भाळते. अमात्याला हीं गोष्ट खटकते म्हणून तो राजा वृषपर्व्याला सावध करण्याचा प्रयत्न करतो. 'सामान्य भोजनांत जसे पाणी तशीच राजविलासी भोजनांत मदिरा' यापद्धतीने तो मदिरेकडे पाहतो तर देवयानीची सखी शर्मिष्ठा 'हे मदिरेचं व्यसन म्हणजे मगरीची पकड ' हे पित्याच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करते. मंदिरा माहात्म्य वाढविणारी वारुणी कचाला नष्ट करु पाहणारे 'द्विजिव्ह' ही पात्रे या नाटकात महत्त्वाची होऊन बसतात. संजीवनी विद्या शत्रूच्या हाती जाऊ द्यावयाची नाही ही. 'द्विजिव्ह' ची प्रतिज्ञा आहे. तर कचाची 'मी अखंड ब्रह्मचारी आहे' ही प्रतिज्ञा, वारुणीसारखी वारांगनाच काय पण कोणत्याही स्त्रीच्या मोहात पडायचे नाही म्हणून आहे. तो व्रतस्य आहे. वैरभावातून कच लांडग्यापुढे फेकला जातो, त्याची रक्षा करून मदिरेतून ती शुक्राचार्याला पाजली जाते. परिस्थिती अशी गंभीर बनते की शुक्राचार्यांचा देवयानीला प्रश्न आहे. 'पिता की वल्लभ ? यातले काय हवे ? ' एक अनिष्ट वळण या नाटकाच्या कथानकाला कच व शुक्राचार्य जिवंत झाल्यानंतर मिळते. वरेरकरांच्या 'संजीवनी' नाटकातील 'कच ' देवयानीचे कोणतेही देणे लागत नसल्यासारखा तुटक वागतो. कच- देवयानी प्रणय रंगाला येथे पार तडा जातो. 3" देवयानी कचाला त्याच्या नव्या जन्माचे स्मरण देते तरीही तो जुन्या बीजांनाच हृदयात जपतांना दिसतो. केवळ विद्या- संपादनासाठीच आपले आगमन होते असे तो सांगतो देवयानी त्याला आता विद्यार्थी - जीवन संपल्याचे सांगते. पण कच हा आपलेच म्हणणे मांडतो. 10 तिच्या भावनेचा विचार करीत नाही. ध्येयनिष्ठ कचापेक्षा ० ' तुझ्या प्रेमाचा स्वीकार मी केव्हांच केला नव्हता देवयानी, मला क्षमा कर. मी अखंड ब्रह्मचर्याचं व्रत पत्करलं आहे. ' 40 8 ( अंक ३ प्र. ५ पृ. ९४ ) अशा अनेक विद्या मला प्राप्त करुन घ्यायच्या आहेत. देवयानी, तू या खोट्या मोहात मला पाडू नकोस ! ' (अंक ३ प्र. ५ पृ. ९५ ) ३०...