पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पौराणिक कथानक घ्यावे लागले. ' ही घटना प्रस्तुत संदर्भात लक्षात घेण्याजोगी आहे. म्हणून मुद्दाम उद्धृत केली आहे. सामाजिक आश- याच्या अभिव्यतीसाठी येथे महाभारत: उपाख्यान स्वीकारल्याचे नाटककाराने उघडपणे मान्य केले आहे. महाभारतातील कथानके ही अशी सामाजिक समस्या आणि परिस्थितीला समर्थपणे अभिव्यक्त करू शकणारी आहेत म्हणून सामाजिक समस्येच्या प्रचाराच्या प्रेरणेने महाभारतकथा योजिली जाते. मामा वरेरकरांच्या या नाटकात हा प्रयोग आहे. प्रचारकी थाट :- नाटककार मामा वरेरकरांचा पिंड लक्षात घेता विपुल नाट्यलेखन करूनही मामांनी चिरंतन व्यापक मूल्यांना क्वचित स्पर्श केला आहे. 'हाच मुलाचा बाप' किंवा 'भूमिकन्या सीता' वगळता त्यांचे कोणतेच नाटक लक्षणीय ठरत नाही. हे लक्षात घेण्याचे कारण त्यांचे 'संगीत संजीवनी' नाटकही याच कोटीतील आहे. त्यांची प्रतिभा तत्कालीन ज्वलंत प्रश्न आणि त्यावर प्रचारकी थाटाचे नाटक बेतण्यात गुंतलेली आढळते. प्रासंगिक आणि ऐतिहासिक महत्व, त्यांच्या या लेखनाला प्राप्त झाले आहे. १९१० साली लिहिलेल्या या नाटकात आपला विशिष्ट दृष्टिकोन धिटाईने मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पौराणिकतेची आपण जपवणूक केल्याची ग्वाही येथे मामा वरेरकर देतात. 3" मदिरेचे स्तोम खाडिलकरांच्या 'विद्याहरणा' प्रमाणेच . याही नाटकात आहे. वरेरकरांची कथायोजना :- वृषपर्व्याच्या राज्यात वाढलेल्या मदिरेच्या माहात्म्याला देवयानी नाक मुरडते. विद्या संपादनासाठी आश्रमात विद्यार्थी म्हणून आलेल्या 38. 'माझं कथानक पूर्णपणें पौराणिक आहे आणि त्यातील भूमिकांचे स्वभावधर्म पूर्णपणे पौराणिक कथेला धरून आहेत. ' असा निर्वाळा मामा वरेरकर नाटकाच्या प्रस्तावनेत देतात. सं. संजीवनी : वरेरकर (१९६०) ( प्रस्तावना) ...२९.