पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ही अवस्था 'शुक्राचार्यांची झाली आहे. वृषपव्यपिक्षा युवराजाला येथे महत्त्वाचे स्थान लाभले आहे. कचाची राख करण्याचा प्रसंग विस्ताराने वर्णन केला आहे. शुक्राचार्यं दारुपायी झालेल्या स्थितीचे वर्णन करतांना म्हणतात, 'राजा, तुझा अविचार आणि माझे व्यसन या दोहोंचा संयोग होऊन त्यामुळे आपली कोण अवस्था झाली. नाटकाच्या शेवटाची कलाटणी तर अनपेक्षित आहे. शुक्राचार्य कचाला जिवंत करतात आणि यापुढे तू देवयानीचा भाऊ म्हणून वावरावे असे सुचवितात. यावर कचाचे उद्गार काहीही भाष्य करू नये असे आहेत. कच म्हणतो, 'ही देवयानीची व्याद आपोआपच टळली ! ठीक झाले! आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळं ! ! (. सं. संजीवनी : पृ. १२४ ) आणि या उद्गाराने नाटक संपते. कच देवयानीच्या प्रेमाला येथे सुरुंग लावला आहे. नावाप्रमाणे तंतोतंत संजीवनी विद्या प्राप्तीपर्यंतच हे नाटक घडते. महाभारतातील कथानकाला कोणतेही कलात्मक रूप या नाटकात प्राप्त होत नाही किंवा विशेष लक्षणीय असा महाभारत कथेचा रूपा- विष्कारही येथे पहावयास मिळत नाही. पण एक गोष्ट लक्षात येते की महाभारतातील कथानक केवळ उपदेशपर म्हणून येथे राबविले आहे. महाभारताच्या अभ्यासाची किंवा चितनाची प्रवृत्ती या सामान्य साहित्य कृतीत दिसत नाही. येथे कथानकाला हवे ते वळण दिले आहे. आणखी एक 'सं. संजीवनी' :- 'सं. संजीवनी' हे मामा ( भा. वि.) वरेरकरांनी १९१० साली लिहिलेले नाटक 'पौराणिक नाटकांचा सामाजिक नाटकासारखा उपयोग प्रथमच केल्याबद्दल वरेरकरांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच होतील. ' स्वतः मामा वरेरकर या नाटकासंबंधी म्हणतात, 'मद्यपान निषेधावर एक सामाजिक कथानक घेऊन नाटक लिहिण्याचा विचार होता. पण जनुभाऊ निमकरांशी मतभेद झाल्यामुळे त्यांना कचदेवयानीचे २८... 87 37 पौराणिके नाटके : डॉ. वि. पां. दांडेकर (१९४१) पु. १५७