पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'हा गेला जरी मम प्राण | तरीही जाण ।

झुकणार नाही ही दारू पुढती कल्पांतीही मान ' ॥ धृ ॥ दारूचे दुष्परिणाम सांगण्याचे साधन म्हणून शुक्राचार्यांकडे आणि या उपाख्यानाकडे नाटककाराने पाहिले आहे. येथे मराठी प्रतिभावंतांच्या महाभारताच्या कलात्मक आविष्काराला फार मोठी मर्यादा पडलेली स्पष्ट होते महाभारतकाराच्या प्रतिभेचा उत्तुंग आविष्कार येथे नाहिसा होतो. ज्ञानसाधना :-

नाटककाराने 'ज्ञानसाधनेसाठी इच्छुक कधीच वंचित राहू शकत नाही' असे प्रतिपादन करून एक वेगळीच कलाटणी या उपाख्यानाला दिली आहे. प्रयत्नाने विद्या सर्वांना निश्चित लाभू शकते. येथे एका अकल्पित वळणाने कथानक प्रवाहित झाले आहे 32 स्वतःचे मत आपल्या वास्तव अनुभवासह महाभारतीय उपाख्यानावर लादण्याचा येथे प्रयत्न आहे. या आरोपातून कथेला एक नवा सूर लाभतो. मदिरा सप्रदायावर टीका करतांना कच, नव्हे कंचाच्या मुखाने जणू नाटककार बोलतो 'बाबांनो! तुम्ही आजपर्यंत पायाखाली तुडविलेला समाज तुमच्या ह्या अमंगळ कृतीनें तुम्हास कनिष्ठ समजून उद्यां तुमच्या डोक्यावर नाचण्याचा प्रयत्न करू लागला तर त्यांत त्याला विरोध कोण करू शकेल ? 83

या सामाजिक आशयाच्या अभिव्यक्ती बरोबरच कचदेवयानी यांच्या उत्कट प्रेमाची महती नाटककाराने स्पष्ट शब्दात सांगितली आहे. श्री. वन्दे यांच्या संजीवनीहरणातील कच या उत्कट प्रेमाची ग्वाही २६... 32 कच १ ल्या अंकाच्या शेवटी म्हणतो, " मधुप, संजीवनी हो विद्या आहे, आणि कोणत्याही विद्येचा मक्ता एकटयाच व्यक्तीकडे असू शकत नाही ! जोपर्यंत सामान्य जनतेचे तिकडे लक्ष जात नाही, तोंपर्यंत है स्वार्थसाधू लोक विद्येचा मक्ता आपणाकडेच काय तो आहे, असे भोळया जनतेला सांगून स्वतःची तुंबडी भरण्यासाठी आणि प्रतिष्ठा वाढविण्यासाठी त्यांना अज्ञानांधःकारात दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत असतात. मधुप, वास्तविक तसें नाही, 'विद्या रंकांना रावांना, पाप्यांना पुण्यात्म्यांना संपादन करण्याचा सारखाच हक्क आहे. ' 33 सं. संजीवनी नाटक : शा. रा. बन्दे (१९३२) पु. ५८