पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

' संजीवनीहरण' कथेवरील हे पौराणिक नाटक असूनही ते स्त्रीपात्र- विरहित आहे. त्यामुळे या कथानकातून देवयानीचा प्रवेश संभवनीय असूनही वगळलेला आहे. देवयानी विरहित संगीत संजीवनीहरण ही एक अभूतपूर्व प्रयोग म्हणावा लागेल. या गृहीतामुळे कथानकावर ज्यो मर्यादा पडल्या त्यातून महाभारतांतील उपाख्यानाला कोणते रूप प्राप्त झाले हे येथे पाहावयाचे आहे. उघडपणे एक शाळकरी स्वरूपाचे हे नाटक झाले ०. महाभारती- तील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या या उपाख्यानांचे केवढे कृत्रिम आणि विकृत चित्रण येथे पाहावयास मिळते. कलाबाह्य प्रेरणेने हे लेखन झालें आहे, त्याचा तो अपरिहार्य परिणाम आहे. शुक्राचार्य, वृषपर्वा, कच आणि अप्रत्यक्ष वावरणारी देवयानी या व्यक्तिरेखा सोडून अन्य सर्व काल्पनिक आहेत. 31 भडक विनोद निर्मितीसाठी हा पात्रांचा भरणा आहे तो नाट्यनिर्मितीत अपरिहार्य वाटत नाही, आणि उपाख्यानातही रंग भरीत नाही. खाडिल- करांच्या विद्याहरणाच्या प्रभावळीतील हे नाटक आहे. येथेही विद्याहरणातील शुक्राचार्यांचा ठसा आहे. खाडिलकरांच्या नाटकाप्रमाणेच येथेही शुक्राचार्यांचा संप्रदाय मद्यप्यांचाच आहे. त्याला, कचाचा आणि आणि कचांच्या प्रेमात पडलेली त्याची प्रेयसी म्हणून देवयानीचा विरोध आहे. देवयानीला सरस्वती कल्पून मद्याचा नैवेद्य तू दाखविला पाहिजे व हे झाले नाही तर तुला घालवून देण्यात येईल असे शुक्राचार्य कचाला बजावतात आणि कंच सुद्धा निर्वाणीच्या शब्दांत सांगतो, 20 'हे नाटक शाळेतील सभा, संमेलने व उत्सव या प्रसंगी मुलांना करतां यावे म्हणून यात स्त्री पात्रे ठेवता आली नाहीत. ' सं. संजीवनी नाटक : शा. रा. वन्दे, १९३२ मानस (प्रस्तावना) पू. १ 31 'मधुप' 'युवराज' 'उन्माद' 'उपहास' 'उद्वेग' ही श्री. वन्दे यांची काल्पनिक पात्रे आहेत. •२५