पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शिरवाडकरांनी 'ययाति आणि देवयानी' नाटकात कच देवयानी हा समास काळाला ही न तोडता येणारा दाखविला आहे. आणि येथे मात्र देवयानी कचाशी असलेले नातेच जणू अव्हेरते. या दुराव्याचे पर्यवसान महाभारतानुसारच होते. हट्टी व क्रोधाधीन झालेली देवयानी कचाला प्राप्त केलेली विद्या फलदायी न होण्याचा शाप देते. कचही 'तुला कोणीही ब्राह्मणकुमार वरणार नाही' असा शाप देतो. एवढ्यावर महाभारत, 'कच स्वर्गलोकी निघून गेला' असे सांगते पण या नाटकातील कच पुढील भाकीत व्यक्त करणारा मुळात नसलेला शाप देतो. 20 एकूण या नाटकात वृषपर्व्याला मुळातील चित्रणापेक्षा अधिक महत्त्व दिले आहे. अवास्तव वातावरणाने या नाटकात मूळ उपाख्याना- तील सजीव व कणखर व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होत नाही. या नाटकाला खाडिलकरांच्या प्रमाणे एखादे उद्बोधनाचे सूत्रही गवसले नाही किंवा कोणताही कलात्मक वापर या कचोपाख्यानाच्या नाटककाराला करणे साधले नाही. सं. संजीवनी नाटक :- शा. रा. वन्दे यांनी सं. संजीवनी नाटक हे १९३२ साली प्रकाशित केले. कचोपाख्यानावर आधारित नाट्यनिर्मितीचा हा प्रयत्न आहे. सामान्य नाट्यकृती म्हणून जसा या नाटकाचा उल्लेख केला जातो तसेच मामा वरेरकरांचेही 'सं. संजीवनी' याच नावाचे एक सुमार दर्जाचे नाटक आहे. या प्रयत्नांचा विस्ताराने परामर्श घेणे फारसे फलदायी नाही म्हणूनच येथे संक्षेपाने विचार केला आहे. स्त्रीपात्र विरहित नाटक :- २४... या नाटकाची प्रथमतः लक्षात येणारी मोज अशी आहे की 20 'तुझं पाणिग्रहण क्षत्रियाकडून होईल, व तिथंही ती तुझी नष्ट सखी शर्मिष्ठा तुझी दासी होऊन शेवटी तिच्या योगानं तुम्ही दोघीही पतिसह वर्तमान आजन्म दु:खी कष्टी व्हाल. · देवयानी अर्थात विद्यासाधन : कृ. ह. दीक्षित, १९१३ अंक ५ पू. १०४