पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'राजदरबारी राजा तो राजा व पुरोहित तो पुरोहित? 2 या उद्- गाराने संतापून शुक्राचार्यही - 'तुम्हाला इतः पर इंद्राचं सिंहासन केव्हाही मिळणार नाही.' असा धिक्कार करून निघून जातात. हे वृषपर्वा आणि शुक्राचार्य यांचे संबंध नाटककाराच्या स्वतंत्र कल्पनाशक्तीने पटण्याजोगे चित्रित केले आहेत. विचित्र मांडणी :- कचाला नाहीसे करण्यात शर्मिष्ठेचाही हातभार आहे हे प्रथमच या नाटकात आले आहे. याचा अर्थ शर्मिष्ठा ही दानवपक्षातील असुर- कन्या असल्यामुळे ती यात सहभागी झाली असावी. पण याचा एक दुष्परिणाम लगेच जाणवतो तो म्हणजे मूळ महाभारतातील उपाख्यानाला तर तडा जातोच पण देवयानी आणि शर्मिष्ठा यांच्या संबंधालाही याचवेळी तडा जातो. 'भवितव्यता बलीयसी' या न्यायाने कच शेवटी विद्या संपादन करतो. यावेळी शुक्राचार्य पिता आणि देवयानी भगिनी सहोदरत्वाने बनते पण देवयानीला हे नाते रुचत नाही. कच नाइलाजाने स्वीकारावे म्हणून आग्रह धरतो पण देवयानी त्याला बोल लावते. * 8 'धर्माला धाब्यावर बसवून गुरुपत्नीशी निर्लज्जपणे गमन कर- णान्या चंद्रापासून तुझी उत्पत्ती असली पाहिजे' असेही कचाला बोलण्यास देवयानी कचरत नाही. प्रियकर प्रेयसीच्या उदात्त प्रेमाला यामुळे निश्चितच तडा जातो आणि या विचित्र मांडणीमुळे नाटकातील औचित्य भंग होतो. महाभारतातील उपाख्यानांवर आधारित साहित्य- कृतीतील बदल अशी मौलिक भर घालतो. तशीच काही वेळा हा बदल रसहानीही करतो याचे उदाहरण म्हणून हे नाटक उल्लेखिता येईल. 28 27 देवयानी अर्थात विद्यासाधन : कृ. ह. दीक्षित, १९१३ (अं. ४ पृ. ९४ ) 'भवितव्यतेच्या झिरझिरीत पडद्याआड उभं राहून आपण आपल्या वरची जबाबदारी टाळू पाहतां, पण असली तो भवितव्यता कोणती आणि ती आपल्या पूर्वीच्या उद्देशाआड येते तरी कशी? देवयानी अर्थात विद्यासाधन : कृ. ह. दीक्षित, (१९१३) अंक ५, प्र. २, पृ. १०३ 23