पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नाही. हे यातून सूचित केले आहे. हा एक नवाच प्रश्न या नाटकात निर्माण केला आहे. महाभारतातील या उपाख्यानाला किती विविध तऱ्हेने विचारात घेता येते याची कल्पना येथे येते. वृषपर्व्याला आपण बाहुबल संपादिले पण बुद्धिवैभवापासून वंचित राहिलो याची खंत आहे. म्हणून. आवेगाने तो म्हणतो, 'एकदा इंद्रपद हाती आलं की या धर्मदंडाला काडकन् मोडून फेकून देतो. २७ वृषपर्वा आणि शुक्राचार्य यांचा संघर्ष संपूर्णपणे नव्याने येथे प्रखर बनविला आहे. भडक रंजन :- येथे रंजनाच्या अवलंबातून चमत्कृतीला आणि अवास्तवतेलाही थारा मिळतो. देवयानी पुरुषवेषात वावरते आणि शर्मिष्ठा छद्यवेशी राक्षसाला मायावी स्त्रीचे रूप घेऊन आपण कचाची पत्नी आहोत असे खोटे सांगून देवयानीचा गैरसमज करविते. दैत्यकन्येला साजेसे शर्मिष्ठेचे वागणे येथे आहे. कचाला स्वतःकडे आकर्षित करून घेण्याचा ती प्रयत्न करते. हे सगळे महाभारताच्या कथानकाला सोडून आहे. कच तिला सांगतो, की एकट्या देवयानी व्यतिरिक्त सर्व स्त्रिया मला तारामाते- समान आहेत. तो तिचा डाव तिच्यावरच उलटवितो. कच तिला 'दासीपणा' चा शाप देतो. अगदी वेगळ्या तऱ्हेने कथेचा विकास येथे झालेला दिसतो. कलात्मक दृष्ट्या या कथानकाच्या विकसनाला फारसा अर्थ नाही. उलट या कपटनाटयाच्या योजनेमुळे नाट्य हरपते. भडक रंजनापलिकडे काही साधत नाही. वृषपर्वा आणि शुक्राचार्य :- वृषपर्वा कचार्चे दहन करून त्याची राख मद्यातून शुक्राचार्यांना पाजतो या गौप्याचा स्फोट 'विनोद' जेंव्हा शुक्राचार्यांजवळ करतो त्यावेळी त्यांना वृषपर्व्याचे खरे रूप उमगते. वृषपर्वा आणि शुक्राचार्य यांच्या वरवरच्या संबंधाचे रूप येथे स्पष्ट होते. हा एक लक्षणीय मुद्दा - आहे. वृषपर्वा स्वतः घमेंडीत खाडिलकरांच्या कीचकाप्रमाणेच उद्गारतो, २२... 26 देवयानी अर्थात विद्यासाधन : दीक्षित, अं. ३ पृ. ६०