पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कच - देवयानी:- दीक्षितांच्या 'देवयानी अर्थात विद्यासाधन' या नाटकातील देवयानी सर्वांवर आपला तोरा मिरवणारी आणि अधिकार गाजवणारी आहे. कचाची भूमिका मात्र सद्भावनायुक्त उदात्त आहे. 24 तो 'संजीवनी साधन' मानतो. हा कच 'संसार-संजीवनीसाठी ' आलेला नाही. महाभारतातील उपाख्यानातून मिळालेली सूचना घेऊन त्याला स्वतःच्या कल्पनेनुसार रंगविण्याच्या प्रेरणेतून असे हे भडक रंग व्यक्तींच्या स्वभावाला आणि आधाराला नाटककार प्राप्त करून देतात. म्हणूनच या नाटकात 'देवयानी करील ती पूर्व दिशा आहे' स्वतःच्या दिमाखात ती कचाला व्रात्य संबोधते. खाडिलकरांच्या विद्याहरणातील 'देवयानी' कचाचे नाव सुद्धा पतीच्या आदरभावाने घेत नाही, ही गोष्ट येथे कचाच्या व्यक्तिरेखेला मारक आहे. 'विद्या साध्य करणं हे ज्याच्या त्याच्या कर्तबगारीवर आहे. त्यासाठी फार मोठे दिव्य करावे लागते ' ही कचाची उदात्त भूमिका आहे. वृषपर्वाही आपल्या भूमिकेला उदात्त - रूप येथे प्राप्त करुन देऊ इच्छितो. देव स्वार्थी म्हणून हा लढा आम्हाला द्यावा लागतो. आमच्या गुरुजींना या देवयानीच्या मायाजालाने पूर्ण जखडून टाकलं आहे' ही त्याची खरी व्यथा आहे. देवकार्य करण्यासाठी आलेला कच मात्र संपूर्णपणे देवयानीच्या मोहजालात गुरफटला आहे. 5 या नाटकात वृषपर्वा स्वतःच कृतघ्नपणे कचाला नष्ट करण्यात पुढाकार घेतो. स्वतः त्याची राख तो शुक्राचार्यांना पाजतो. त्याला राजदंडाचा विशेष अभिमान आहे. वृषपर्वा आणि शुक्राचार्य यांच्यातील संघर्षाला या नाटकात राजदंड आणि धर्मेदंड यातील संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दोन्हींचा उत्तम मेळ असावा. यापैकी एका गोष्टीने भागणार 24 'देव दैत्यांची एकी व्हावी, दोघांच्या संमिश्रित बलाचा जगाच्या उद्धाराकडे उपयोग व्हावा. शांतिदेवीच्या कृपापूर्ण दृष्टीने हे अखिल जगत सदैव सुखपूर्ण असावे हा तर माझा हेतू. ' देवयानी अर्थात विद्यासाधन : अंक १ पृ. ५ 25 देवयानी अर्थान विद्यासाधन: दीक्षित, अंक १, पु. १५ -- २१