पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आहे. शुक्राचार्य हे आदर्श शिक्षक. कविकुलगुरु होते असे या नाटकात आहे. 'विद्याहरणा'त वृषपर्व्याला एक मदिरा संप्रदायातील अधिराज म्हणून स्थान आहे. कचाला मारण्यात त्याचा हात असतो पण विद्यासाधन नाटकात वृषपर्व्याला अन्यत्र क्वचित आढळणारे महत्त्वाचे स्थान आहे. त्याला महत्त्व मिळावे अशी कामगिरी त्याच्यावर आहे. विद्याहरणातील गौणपात्रे नाटकाच्या संदर्भात अनावश्यक वाटतात व नाट्याच्या लयीत बसत नाहीत. अशा पात्रांचा भरणा 'विद्यासाधन' मध्ये नाही. कारण कथानकाच्या सदर्भात त्यांना कोणतेही महत्त्व लाभू शकत नाही. दारूच्या दुष्टं व्यसनापासून समाजाला अलिप्त ठेवण्याच्या सामाजिक कार्याची महती या कालखंडातील नाटककारांना विशेष जाणवलेली दिसते. म्हणून लोकशिक्षणासाठी त्यानी आपली नाट्यप्रतिभा योजिली. प्रा. अ. ना. देशपांडे यांनी आपल्या आधुनिक मराठी वाङ्मयाच्या इति- हासात या प्रवृत्तीची नोंद घेतली आहे. 22 आपल्या नाटकाच्या प्रस्तावनेत दीक्षितांनी भवितव्यतेचे चित्रण मनोरंजक व विनोदी पद्धतीने कथन करण्याचा आपला हेतू स्पष्ट केला आहे. " मनोरंजक पद्धतीने महाभारतातील उपाख्यान नाट्यरूपातून सांगणाऱ्या नाटकांच्या गटातील हे नाटक आहे. महाभारताधिष्ठित ललित वाङ्मयात रंजनाची एक प्रवृत्ती प्राधान्याने अर्वाचीन मराठी साहित्याच्या पूर्वार्धात आढळते. 22 'कृष्णाजी हरि दीक्षित या नावाचे एक जबरदस्त व महत्त्वाकांक्षी नाटककार याच काळात होऊन गेले. ' आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास : अ. ना. देशपांडे ( पुनर्मुद्रण १९७४) पृष्ठ २८८ 29 'रा. दादासाहेब व रा. काळे यांनी बरीच कथानके मला सुचविली पण त्यामध्ये भवितव्यतेचें यथायोग्य चित्र रेखाटता येईल अशी देवयानीच मला व त्यांनाही पसंत वाटली... यामध्ये शृंगाराचा शक्य तितका अभाव, मनोरंजक विनोदाच्या मर्यादित मिश्रणामुळे भरपूर हास्यरस व • स्थलोस्थली सहज ग्रहण होतील असे मनोवेधक चुटके आणण्याचा मी प्रयत्न केला आहे. ' २०... देवयानी अर्थात विद्या साधन दीक्षित (प्रस्तावनेतून )