पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न मानता सर्वच प्रकारच्या लोभाचा प्रतिनिधी म्हणून चित्रित करतात, त्यातून मूळ उपाख्यान वेगळ्या दिशेने प्रवाहित होऊन महाभारताच्या मूळ कथानकाचा नवा आविष्कार होतो. त्याचप्रमाणे विद्याहरणातही महाभारतातील कचोपाख्यान नवे रूप धारण करते. खाडिलकरांनी 'मद्यपान निषेध' हे एक कथासूत्र गृहीत धरुन 'विद्याहरण' लिहिले म्हणून या गोष्टीला येथे विशेष अवसर मिळाला आहे. तात्पर्य, विद्याहरण नाटकात खाडिलकरांनी कच, देवयानी, शुक्राचार्य या स्वभावचित्रांवर अत्यंत हृदयंगम प्रकाश पाडल्याचे दिसून येते. कचदेवयानीच्या प्रेमकथेला उत्कटतेने चित्रित करून शुक्राचार्यांचे एक अविस्मरणीय स्वभावचित्र रेखाटले आहे. 'देवयानी अर्थात विद्यासाधन' :- 'देवयानी अर्थात विद्यासाधन' हे कृ. ह. दीक्षित यांनी १९१३ साली लिहिलेले महाभारतातील कचोपाख्यानावर आधारित पौराणिक नाटक आहे. पौराणिक नाटककार म्हणून दीक्षितांची ख्याती आहे. कृ. प्र. खाडिलकरांप्रमाणेच दीक्षितांची नाटकेही विचारप्रधान आहेत. त्यात भोवतालच्या परिस्थितीचा ठसा उमटलेला आढळतो. खाडिलकरांचे विद्याहरण आणि दीक्षितांचे 'विद्यासाधन' एकाच वर्षात लिहिलेले आहे. पौराणिक कथानकाच्या निवडीपासूनच दीक्षितांवर खाडिलकरांच्या नाट्यवाङ्मयाचा प्रभाव पडलेला जाणवतो. मद्यपान निषेधाच्या प्रेरणेने खाडिलकरांचे 'विद्याहरण' प्रामुख्याने जन्मले आहे तर 'विद्यासाधन' नाटकात विद्याहरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. महाभारतात शुक्राचार्यांची भूमिका जेवढ्या प्रकर्षाने ती खाडिलकरांच्या विद्याहरणात किंवा दीक्षितांच्या प्रस्तुत नाटकात आली संकलित परिणाम कचाकडून विद्याहरण होण्यात होतो.' 37 देवयानी आणि शर्मिष्ठा : प्रा. राम मंत्री (लेख) इथे मराठीचिये नगरी: वर्ष १ ले अंक : जून-जुलै १९७७ ..१९