पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उजाळा मिळालेला दिसतो. या नाटकाच्या शेवटी कचदेवयानी प्रेमाला आणखी भव्योदात्त स्वरूप देणे विद्याहरणात संभवनीय होते पण खाडिलकरांचे सगळे लक्ष नाटकाचा विषय 'मद्यपान निषेध' निश्चित करण्याकडे लागले होते त्यामुळे त्यांना देवयानीच्या प्रेमजीवनाची खरी शोकांतिका रंगविताच आली नाही. पेच प्रसंगात सापडलेले शुक्राचार्य आणि त्यांची द्विधा मनःस्थिती ही खाडिलकरांची स्वतंत्र निर्मिती आहे. देवयानी आणि अधिराज यात कोणाचे प्रिय करावयाचे हा त्यांना न सोडविता येणारा प्रश्न आहे. ' 20 देवयानीचे उत्कट प्रेम, शुक्राचार्यांचे देवयानीवरील प्रेम आणि त्यांचे दारुचे व्यसन या गोष्टींची स्वतःला असलेली अनुकूलता लक्षात घेऊन कचाने संजीवनी विद्येचे हरण केले. महाभारतात शुक्राचार्यांचा असा मद्य संप्रदाय नाही. सहवासातील प्रत्येकाला ते मद्यपानाचा आग्रह धरीत नाहीत. मद्य सेवनाच्या अतिरेकाने त्यांचा असा अध:पात झाल्याचे जाणवत नाही तर वृषपर्वादी (शत्रू ) स्वकीय पक्षांनीच केलेल्या विश्वास- घातानेच विद्या गमावण्याचा प्रसंग त्यांच्यावर येऊन ठेपला. महा- 'भारताच्या उपाख्यानातील शुक्राचार्य मदिरेबरोबरच दानवांच्या या कृत्याला जबाबदार धरतो. पण मद्यपाननिषेधाचा प्रश्न खाडिलकरांना महत्त्वाचा वाटला म्हणून त्यांच्या नाटकाचे कथानक स्वतंत्रपणे विकसित झाले. 21 वि. स. खांडेकर जसे ययातीला, केवळ काम भावनेचा प्रतीक १८ .. 20 21 26 'अधिराज, हा माझा मुलगा, हो माझी मुलगी. युवराज, तुला दुःखी कष्टी ठेवून मी सुखी रहाणे शक्य नाही. देवयानी, तुझ्या प्राणांबरोबर माझेही प्राण शरीर सोडून बंधमुक्त होतील! अधिराज, मी काय करू? दोघेही हट्टी, आणि यांचा हट्ट अगदी एकमेकांशी विरुद्ध ! याला बोल लावता येत नाही, हिला दूर सारता येत नाही. माझा धर्म कोणता हेच मला यावेळी समजत नाही! " विद्याहरण: (पृ. ६५-६६ ) " कचाचे कारस्थान, स्वजनांचा मुर्खपणा आणि अविश्वास, त्यात भर म्हणून देवयानीवरील त्याचे आंधळे प्रेम आणि तिचा स्त्री हट्ट या सर्वांचा