पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रा. ना. सी. फडके, प्रा. वा. ल. कुलकर्णी, व. शां. देशाई या खाडिलकरांच्या नाट्यकृतीच्या समीक्षकांनी विद्याहरण: नाटकाच्या संदर्भात आपली स्वतंत्र मते मांडलेली आहेत. येथे नाटककाराची या कडे कोणत्या दृष्टीने पाहते हा विचार लक्षात घ्यावयाचा आहे. शुक्राचार्यांचे अपत्यप्रेम त्यामुळे निर्माण झालेला पेचप्रसंग 'कच की देवयानी ? अपत्यप्रेम की संप्रदाय ? ' हा आहे. शिवाय शुक्राचार्य 'प्रतिस्पर्ध्याचां विजय माझी वाणी उच्चारीत नसते. शत्रूला मी आशीर्वाद देत नसतो.' या बाण्याचे आहेत. हे शुक्राचार्य खाडिलकरांनी नव्याने रंगविलेले आहेत. संप्रदायातील शिष्याचे प्रिय करावयाचे की पायाशी बिलगलेल्या अपत्याचे- देवयानीचे म्हणणे मान्य करावयाचे असा पेच प्रसंग शुक्राचार्यांपुढे निर्माण झालेला असतो. कच आणि देवयानी मुळापेक्षा वेगळ्या तऱ्हेने येथे साकार केले आहेत. कचाचे पौरुष, ध्येयनिष्ठा, श्रेष्ठ मूल्याबद्दलचा आदर, प्रेयसापेक्षा श्रेयसाकडे असणारी त्याच्या मनाची साहजिक ओढ, त्याचा प्रबल आत्म- विश्वास, या गुणांना खाडिलकरांनी अधिक उजाळा दिला आहे. देवयानीच्या निर्व्याज मनोहर प्रेमाने हे सारे नव्याने उजळले आहे. या पुढील कचोपाख्यानातील साहित्यकृतीत कचदेवयानीच्या प्रेमाला अधिक 19 'विद्या शिकण्यासाठी आलेल्या कचाला शुक्र ठेवून घेतो हीच मुळी. तर्काला पटणारी गोष्ट नाही! 'पुराणकथेत नक्की काय आहे ते 4 सांगता येणार नाही. ' खाडिलकरांच्या नाट्यकृती : प्रा. ना. सी. फडके, प. आ. १९७२ पृ. १३७ 'माझ्या मते खाडिलकरांनी देवीसंपत्ती विरूद्ध आसुरी संपत्ती ह्यांज मधील झगडा दाखविण्याची ही आयती चालून आलेली संधी दवडली. ' नाटककार खाडिलकर एक अभ्यास : ले. वा. ल. कुलकर्णी, आ. १ ली. १९६५ (पृ. ६१) आज आपल्यासमोर येणारा शुक्राचार्य हा संजीवनी विद्या प्राप्त झालेला एक दारुड्या आहे.' नाटककार खाडिलकर : एक अभ्यास : वा. ल. कुलकर्णी, आ. १ ली, १९६५ (पू. ६० ) १७ ०