पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वधा 'इतकी स्पष्टपणे या नाटकावर उमटलेली नसली तरी विद्याहरण नाटकाला तसे हेतू चिकटविण्याचे प्रयत्न झाले आहेत. ' 17 त्याचप्रमाणे विद्याहरणातील रुपक उलगडून दाखविणान्या . सन्मित्र समाजाच्या १९२३ सालच्या एका पद्यावलीत शत्रूच्या गोटात आणि पोटात शिरुन विद्या संपादन करावी असे सुचविले आहे. 18 'मद्यपाननिषेध' हे नाटकाचे मुख्य प्रतिपादन वाटत असले तरी येथे नाटकातील आशयाभिव्यक्तीविषयी स्वतंत्रपणे विचार केलेला दिसतो. मद्यपान समस्या हे खाडिलकरांना आनुषंगिक स्फुरण वाटते. कारण खाडिलकरांचा शुक्राचार्य केवळ मद्यपान संप्रदायाचा निर्माता नाही तर स्वतःच्या कठोर तपश्चर्येने संजीवनी विद्या प्राप्त करुन घेतलेला आहे. बृहस्पतीलाही आपला पुत्र विद्यासंपादनास पाठवावा असे वाटले इतपत तो थोर आहे. देवयानीच्या मदतीने कचाला वश करण्याचा शुक्राचार्यांचा खरा sta होता पण त्यांच्यातील पिता देवयानीपुढे हतबल होतो ही एक पिता म्हणून दाखविलेली शुक्राचार्यांची शोकांतिका, हृदयस्पर्शी आहे. कन्या- प्रेमापायी शुक्राचार्य हतबल होतो. 17 18. "परदेशात जाऊन परत आलेले विद्यार्थी 'बाईच्या आणि बाटलीच्या नादी लागत होते, त्यांना सावध करण्याकरता हे नाटक लिहिले. " खाडिलकरांची नाट्यसृष्टी : व. शां. देसाई, 3 आवृत्ती १ ली १९७२ (पृष्ठ ५१) 'शत्रुच्या पोटि शिरोनी । घ्या त्यांची विद्या शिकुनी हा थोर बोध देणार । विसरा ना कृष्ण कवीला ॥ जा इंग्लंदाला जन हो । भौतिकशास्त्रा आणा हो || देशाचा करि उद्वार | कृष्णकवि नाटकि वदला || 'शत्रुच्या पोट शिरावे । मोहाला झिडकारावे विद्याहरणाचे सार | नाटकात कंविही वदला ॥ 'विद्याहरणातील रुपक : ( संकलन ) म. सा. पत्रिका नाट्याचार्य खाडिलकर विशेषांक अंक १८३ नोव्हेंबर १९७२ " १६...