पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साकार करण्यापेक्षा आपल्या उद्दिष्टानुरूप प्रकाशात येणान्या व्यक्ति- त्त्वाच्या अंगालाच महत्त्व प्राप्त झाले आहे. शुक्राचार्यांच्याविषयी हे घडले आहे. मदिरा आपल्या पंथाची प्रतीक मानून तिला अव्हेरणारा कच. त्यांना परका वाटतो. मद्यपान हीच येथे अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरते. नाटकाच्या शेवटी शुक्राचार्यांच्या प्रदीर्घ भाषणातून नाटककाराला हाच एक महत्त्वाचा परिणाम साधावयाचा होता हे स्पष्ट दिसते. अपत्य- स्नेहात गुंतलेले शुक्राचार्य 'विद्याहरणा'त व्यसनाधीन लोकनेता बनतात. 15 कालसंदर्भातील आव्हान यशस्वीरीत्या मांडता आले. म्हणून काही विद्याहरणासारखे नाटक श्रेष्ठ ठरत नाही. एखाद्या कलाकृतीच्या श्रेष्ठत्वाचे खरे गमक तिचे कालातीत आवाहन हेच असते यादृष्टीने विद्या- हरणाच्या आवाहनाचा विचार केला तर त्यात अतिरेकी मद्यपानासारख्या ब्यसनाधीन माणसाच्या विवेक शून्यतेचे चिरंतन चित्र रेखाटलेले आढळते. खाडिलकरांच्या नाट्यविश्वात तत्त्वचिंतनाला फार महत्त्व आहे. " तत्कालीन राजकीय वा सामाजिक परिस्थितीची छाप ' कीचक- 15 'त्याच्या अधःपाताचे विदारक चित्र जेंव्हा मूर्तिमंत साकार होऊन पुढे उभे राहिल्यावर तत्कालीन प्रेक्षक खडबडून जागा झाला असेल यात शंका नाही.' संपादकीय : खाडिलकर नाट्यविशेषांक : म. सा. पत्रिका अंक १८३ . ऑ. नो. डि. १९७२ 1" "तचितन हा त्यांचा प्रकृतिधर्म असल्यामुळे नाट्यकृतीच्या उगमस्थानी असणाच्या संघर्षात काय किंवा विविध भूमिकांच्या चित्रणात काय, केवळ नाटयाची रंगत साधली एवढ्यानं ते संतुष्ट होत नाहीत. त्या संघर्षाच्या प्रवाहात सापडलेल्या विविध स्वभावांच्या व्यक्तीचं नुसतं ठसठशीत चित्रण करून त्यांचं समाधान होत नाही. त्या संघर्षाच्या मुळाशी असलेल्या जीवनाच्या प्रेरणांतून ज्या अटळ समस्या निर्माण होतात त्याचीही उकल करण्याचा ते प्रयत्न करतात. खाडिलकरांच्या नाटकातील तत्वचिंतन : " वि. स. खांडेकर (लेख) : म. सा. पत्रिका नोव्हें. ७२ (पृ. २) 10. १५