पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जाळता येतो - पण देह धारण करुन स्वकीयांची सेवा निरपेक्ष बुद्धीने करण्याच्या इच्छेचा मूलाधार शरीरातील आत्मा. युवराज कोणालाच जाळता येत नाही. 'मरतांहि भय नाही शिवले कचाला || ' असे कचाचे व्यक्तिमत्त्व आहे. नाटकाच्या शेवटी पित्याच्या विशिष्ट भूमिकेने विशद केलेले बहीणभावाचे नाते त्यांना स्वीकारावेच लागते. अनिच्छेने आणि वृष- पर्याच्या चुकीमुळे नाइलाजानेच शुक्राचार्यांनी कचाला संजीवनी विद्या दान केली असा याचा अन्वयार्थ आहे. शेवट वर्णिलेली देवयानीची अहंकाररहित स्थिती मूळकथा भागाला धरुन नाही. मुळात कच देवयानी परस्परांना शाप देतात पण येथे तर ही देवयानी उदात्त प्रेमाचे तत्त्वज्ञान सांगते. त्यातून तिच्या उज्ज्वल प्रेमाची आणि प्रेयसीने स्वीकारावयाच्या • भूमिकेची प्रचीती येते. 13 खांडेकरांची हीच अनुभूती आहे. * मद्यपान निषेध : विद्याहरणाचा हेतू :- खाडिलकरांच्या सं. विद्याहरण नाटकाचा हेतू मद्यपान निषेध हा आहे. त्यासाठी त्यांनी महाभारतातील कचदेवयानी या कथेचा आधार घेतला आहे. मद्यपानाचे दुष्परिणाम दाखविणे हेच येथे त्यांचे साध्य आहे. या साध्यावर त्यांनी या नाटकात आपले लक्ष केंद्रित केल्यामुळे व्यक्तिरेखाही साधनीभूत होऊन विशिष्ट तत्त्वाच्या पुरस्कारासाठी अस्तित्वात आल्या आहेत. त्यामुळे व्यक्तींच्या सर्वंकष व्यक्तित्वाला १४... 13 . 'साध्वीच्या हृदयातील पतिप्रेम इतके उज्ज्वल असते की अहंकाराचा हिणकस त्यात किंचितही सापडावयाचा नाही.' (पृ. ८० ) 14 " मूळ कथा वांचता वाचता दुसरी एक गोष्ट माझ्या लक्षात आली. ती म्हणजे खाडिलकरांच्या विद्याहरणामुळे परिचित झालेली देवयानी ही महाभारतातल्या देवयानीहून अत्यंत भिन्न आहे ही देवयानी मुख्यतः प्रणयिनी आहे. हट्टी, अल्लड पण प्रेमभावनेत स्वतःला विसरून जाणारी अशी प्रेयसी आहे. महाभारतातील देवयानी अशी उत्कट प्रणयिनी नाही. तिच्या स्वभावात विविध गुण दोषांचे मिश्रण झाले आहे. ' पार्श्वभूमि : 'ययाति' वि. स. खांडेकर, आ. ४ थी १९६७ (पृ. ४५५-४५६) "