पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

rer निश्चित निर्णय काहीतरी लागेल असा दिलासा स्वतः शुक्राचार्य देतात. या प्रसंगाच्या निमित्ताने शुक्राचार्यांच्या स्वभावाचे दर्शन घडते. शुक्राचार्यांचे हे देवयानीवरील प्रेम जाणून युवराज वृषपर्ध्याला म्हणतो, 'आपण संसारी असून अपत्यप्रेम दाखवीत नाही आणि गुरुवयं तपोनिधी असून अपत्य प्रेम मानतात ' या बोलण्यातून वृषपर्व्याने आपण राजा होऊ शकू याची तरतूद करुन ठेवावी हे सूचित केले. पण राजाचे - हवे तेवढे लक्ष नाही म्हणून आपली खंत येथे बोलून दाखविली आहे. कचदेवयानी प्रणय रंग:-- 11 कचदेवयानीचा प्रणय प्रसंगही खाडिलकरांच्या प्रतिभेने रंगतदार नवला आहे. मधुबनातील प्रसंगांतून कचदेवयानीच्या परस्परांवरील उत्कट प्रेमाची साक्ष पटते. कचाचा दोन वेळा युवराज व त्याचे साथीदार वध करतात तेंव्हा देवयानी चिडून युवराजाला ऐश्वर्यनाशाचा. शाप देते. त्यावरुन संजीवनी विद्याहरणाचे भाकीत व्यक्त होते. कारण जोपर्यंत संजीवनी विद्या आहे तोपर्यंतच दैत्यांना ऐश्वर्य, वैभव आहे. पण युवराजही कणखर आहे. शत्रूला मारणेच योग्य मग त्यासाठी तो आत्मबलिदानाला तयार आहे. शेवटी शुक्राचार्य 'संजीवनी विद्या माझ्या प्राणाबरोबरच हरण होईल' असे आश्वासन युवराजाला देतात. देवयानी आपले कचावरील उदात्त प्रेम बोलून दाखवितांना म्हणते 'बाबा माझ्या प्रेमाचे शब्दचित्र आपणासारख्या स्वयंभू कवीलाही काढता येणे शक्य नाही.' (पृ. ५६ ) तिच्या या उदात्त प्रेमाची ही वर्णने मूळ उपाख्यानात नसून शृंगाररसाला पोषक म्हणून ही चित्रणे खाडिलकरांनी रेखाटलेली आहेत. शुक्राचार्यांची विवाहास संमती अस- ल्याचे पाहून कच म्हणतो, 'संजीवनी विद्येशिवाय देवयानीचे पाणिग्रहण करता येत नाही. संजीवनी विद्येच्या लोभाने मी देवयानीवर प्रेम केले नाही व करीत नाही. परमेश्वरसाक्ष माझे देवयानीवर निर्लोभ प्रेम आहे. युवराज कचाला जाळायला निघतो तेव्हा कच म्हणतो, 'देह

  1. 12

11 विद्याहरण: कृ. प्र. खाडिलकर, आवृत्ती ८ 12 विद्याहरण : कृ. प्र. खाडिलकर, आवृत्ती ८ १९७२ (पृ.७७ ) १९७२ (पृ. ५७) १३. .