पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ होते. साधन म्हणून पाठविलेला बेकेट खरोखरच कामगार, श्रमजीवी. विश्वाशी एकरूप होतो. तशी देवयानी कचावर अतूट प्रेम करते, त्यामुळे शुक्राचार्यांना कचाला जिवत करून संजीवनी विद्या देणे भाग पडते. प्रीतीच्या बळावर कच करीत असलेले विद्याहरणाचे धाडस पाहून देवयानी त्यावर भाळते, तर कच स्वतःच्या खडतर तपश्चर्यासामर्थ्यावर विश्वास ठेवतो आणि ध्येय गाठतो. वधाच्या भीतीने असहाय्य होत नाही. शत्रूच्या गोटात असूनही ताठ मानेने वावरणारा हा कच आहे आणि तरीही तो देवयानीचा प्रियकर आहे. ही खाडिलकरांनी निर्माण केलेली नवी रंगत आहे. शुक्राचार्यांच्या अतिरेकी अपत्यस्नेहाचे दर्शन येथे खाडिलकरांनी नव्याने समाविष्ट केले आहे. मूच्छित झालेल्या देवयानीला सावरतांना शुक्राचार्य म्हणतात .. ' हिच्याबरोबर माझीही जीवनज्योत मावळू लागते.' एकीकडे हे अपत्यप्रेम आणि दुसरीकडे एक तप:सामर्थ्य असलेले दैत्यगुरु म्हणून वृषपर्वन राजाची स्वीकारलेली जबाबदारी अशी त्यांची स्थिती आहे. शेवटी असहाय्य होऊन त्यांना वृषपर्व्याला वेगळीच गुरुदक्षिणा मागावी लागते. 10 द्रोणाचार्यांची आठवण व्हावी असा हा एक समांतर प्रसंग येथे वर्णिलेला आहे. महाभारतातील धृतराष्ट्र कौरवाविषयीचा अपत्यस्नेह मनातल्या मनात दडवून ठेवतो व वरकरणी कौरव-पांडव समान असल्याची बतावणी करतो. तसे शुक्राचार्य अपत्य प्रेमात गुरफटलेले असले तरी त्यांचे प्रेम आंधळे नाही. ते सरळ देवयानीला कचाचे मन वळविण्यासाठी एक वर्षाची मुदत देतात. सगळ्यांनाच ही मुदत जास्त वाटते कारण सर्व बाजूंनी ताण निर्माण झालेला हा कालावधी आहे. 'या अवधीत कचतरी स्वकीयांवरील भक्तीचे धागे तोडील. ' देवयानी तरी प्रियकरांवरील प्रेमाचे धागे तोडील किंवा हा शुक्रतरी अपत्यस्नेहाचे धागे तोडील. ' १२... 10 'अधिराज कचाला हाकून द्यावयाला मी तयार असलो तरी माझा शब्द खरा करून दाखविण्याचा हट्ट आपण आणखी एक वर्ष धरू नका. असली गुरुदक्षिणा मागण्याकरिता मी आलो आहे.' ( विद्याहरण: पृ. ३५)