पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यक्तींचे स्वभावदर्शन:- खाडिलकरांच्या नाटकातून व्यक्तींच्या अंतर्द्वद्वांचे चित्रण प्रभावी- पणे झाले आहे. व्यक्तींच्या अंतःकरणातील विविध भाव-भावनांची आंदोलने अधिक परिणामकारक व तीव्र बनविण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. विद्याहरण नाटकात देवयानीच्या मनात कचाविषयी वाटणाऱ्या प्रेमाची तळमळ जशी कौशल्याने ते रंगवितात; त्याचप्रमाणे शुक्राचार्यांच्या मनातील स्वतःच्या अधःपाताविषयोची तळमळही त्यांनी मोठ्या तन्मयतेने रंगविली आहे. कचाची ध्येयनिष्ठा आणि त्याच्या मनात निर्माण झालेला 'प्रेम की कर्तव्य' हा संघर्ष प्रभावीपणे विद्या- हरणात आलेला आहे. वि. वा. शिरवाडकरांच्या ययाती आणि देवयानीं नाटकातील देवयानी कचाशी सुद्धा विशिष्ट प्रसंगी अहंकाराच्या दिमाखात वागतांना दिसते, तसे चित्रण विद्याहरणात नाही. खऱ्या प्रेमामुळे या देवयानीचा सगळा अहंकार अगदी आरंभीच गळून गेला आहे. शिरवाडकरांच्या नाटकात शत्रुटी तिचा अहंकारही नाहिसा होतो. या ठिकाणी प्रथमदर्शनी प्रेमासारखी देवयानीची स्थिती झाली आहे. कचदेव आले, पाहिले, आणि त्यांनी तिला जिंकले. त्यामुळे ती कचाशी सांधे भांडणही करू शकत नाही. उलट कचाला आदरार्थी संबोधनाने ती संबोधते. 'त्यांचा (कचाचा) अपमान न होता आपला सन्मान करायला मी तयार आहे. ' ( पू. १३) देवेंद्राच्या सभंत देवयानीचे मन प्रसन्न ठेवण्याचा विडा उचललेला 'कच' येथे आहे. कारण त्याला खात्री आहे की देवयानीचे मन जिंकून घेतल्यावर शुक्राचार्यांचा क्रोध आपले भस्म करु शकणार नाही. " देवयानीला शुक्राचार्य आणि कच दोघांनीही आपापल्या हेतूं- साठी राबविले आहे. त्यामुळे देवयानीची मनःस्थिती नेहमीच दोलायमान होते. मासा पकडतांना आमिष जे कार्य करते, तशी देवयानीची स्थिती माहे. पण देवयानी आमिष बनत नाही. 'बेकेट' सारखी तिची स्थिती D 'तुझ्या बाबांच्या क्रोधाचा वडवानल तुझ्या व माझ्या प्रेमाच्या सागराचे पोटात बुडी मारून दडून राहील.' (सं विद्याहरण, पू. ३.४) J ११.