पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रश्न निर्माण होतो. त्याला खाडिलकरांच्या या नव्या कल्पनेने उत्तर दिले. खाडिलकरांनी शुक्राचार्यांना येथे अधिक मानवी केले आहे. हीच गोष्ट खाडिलकरांनी 'युवराज' या नव्या पात्राची योजना करुन साधलेली आहे. हा युवराज म्हणजे वृषपर्व्याचा पुत्र असून त्याला नेहमी स्वतःच्या भवितव्याची काळजी आहे. त्याला ' कच' हा फार मोठा अडथळा वाटतो. त्याच्या क्षीरसागरात तो त्याच्या दृष्टीने 'मिठाचा खडा' असतो. युवराज अहोरात्र या गोष्टीची चिता करतो. 'कच देव - यानीसह संजीवनी विद्या हरण करील' ही त्याची रास्त भीती आहे, आणि त्याच्या भीतीप्रमाणेच घडते. मूळ उपाख्यानात केलेल्या या बदलाने कथानकात नवी रंगत निर्माण होते आणि कथानकाचा विकास होतो. त्यात नाट्यानुकूलता निर्माण होते. 'राधेय' कादंबरीतील 'चक्रधर' किंवा 'मृत्युंजय' कादंबरीतील 'शोण' 'ययाती आणि देवयानी' नाटकातील 'विदूषक' ह्या व्यक्तिरेखा, खाडिलकरांच्या प्रस्तुत नाटकातील युव- राजाप्रमाणेच पूरक म्हणून येतात. देवयानी आईविना पोरकी आहे हे दाखवून खाडिलकरांनी शुक्राचार्यांना द्विधा मनःस्थितीत ठेवले आहे. शुक्राचार्यांना एकाच वेळी देवयानीचा पिता आणि देवयानीची माता या दोन्हीही भूमिका वठवाव्या लागतात. जेव्हा शुक्राचार्य मनाविरुद्ध वागतात तेव्हा देवयानीच्या, 'आई जिवंत असती तर - या करुण उल्लेखाने शुक्राचार्य हळवे बनतात आणि त्यांची भूमिका पार बदलते. अशी अनेक स्थाने या नाटकात दाखविता येतात. त्यातून निर्माण होणारे हे द्वंद्व व्यक्तींचे भावविश्व ढवळून काढते. निर्णय घेणे अवघड असते आणि या द्विधा मनःस्थितीत या व्यक्तींच्यामधील माणूसपणाचा साक्षात्कार विशेष जवळून होतो. देवयानीपुढे प्रश्न निर्माण होतो 'पिता की प्रियकर ? ' शुक्राचार्यांपुढे प्रश्न निर्माण होतो, 'कन्या को संजीवनी विद्या ? ' आणि कचा समोर या नाटकात प्रश्न आहे, 'देवयानी की विद्यासाधना?' असे विभिन्न ताण एकाचवेळी निर्माण करण्याचे सामथ्यं खाडिलकरांनी महाभारतातील या उपाख्यानाला स्वतःच्या नाट्य- प्रतिभेचा स्पर्श करुन प्राप्त करुन दिले आहे. १०...