पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इ देण्याची इच्छा आहे. पण धृतराष्ट्राला, द्रोणाचार्याला जसा अपत्यस्नेह, पुत्रमोह आहे; त्यापुढे काही सुचतच नाही; तशीच स्थिती या नाटकातील शुक्राचार्यांची आहे. 'देवयानी मला, पुत्र जणु एकला ! अशी त्यांची स्थिती आहे. असुर राजाचे गुरु असूनही आपल्या लाडक्या एकुलत्या एक कम्येपुढे त्यांचे काही चालत नाही शुक्राचार्यांना जुळते घेण्यापलीकडे आणि देवयानीच्या इच्छेला सादर होण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही. सुरुवातीला शुक्राचार्यांनीच देवयानीला कचावर प्रेम करण्याचा सल्ला दिला आहे. पण त्यांना खरोखरच कच - देवयानी हा अभंग समास त्यातून घडेल याची कल्पना नव्हती. या समासाचा विग्रह होत असला तरी तो समासच आहे, याचा विसर शुक्राचार्यांना पडलेला दिसतो. शुक्राचार्यांना देवयानी पूर्णपणे कचावर अनुरक्त होईल. त्याच्या संपूर्ण आधीन होईल याची कल्पनाच आली नाही. यातून एक नवे नाट्य येथे उमलले आहे. या नाटकातील शुक्राचार्य संजीवनी विद्या आपल्या जावयाला हुंडा म्हणून जाहीर करतात. शुक्राचार्य इंद्राने देवलोकातून पाठविलेल्या ज्ञानी कचाला विद्यार्थी म्हणून स्वीकारतात पण स्वतःच्या जाळ्यात सापडावा ह्या हेतूने! देवयानीला ते म्हणतात 'उलट तू कचावर प्रेम करुन प्रेमाच्या जोराने कचाला माझ्या संप्रदायाच्या पचनी पाड, अशी माझी आज्ञा 5 आहे " खाडिलकरांची देवयानीसुद्धा या गोष्टीला उद्युक्त होते. ती म्हणते " बाबा! आपल्या सांप्रदायात त्यांना प्रेमाने ओढून घेण्यास मी कधी तरी कमी करीन काय ? वाडवडिलांच्या संप्रदायांत पुरुषांना गुरफटून टाकण्याकरतांच आम्ही बायका जन्माला आलेल्या असतो "8 येथे देवयानीच्या प्रेमाविषयी शंका येऊ लागते. प्रेम ही एक मोठी शक्ती हे जाणून शुक्राचार्य हा धूर्त डाव टाकतात पण तो त्यांच्यावरच उलटतो. महाभारतातील कथानकात देवलोकातील - शत्रुपक्षातील माणसाला, विद्या देण्यासाठी शिज्य म्हणून शुक्राचार्य स्वीकारतातच कसे? असा जो 7 सं. विद्याहरण: कृ. प्र. खाडिलकर, १९७२ अंक १ ( पू. १४) 8 सं. विद्याहरण: कृ. प्र. खाडिलकर, आ. ८ वी, १९७२ (पृ. १२)