पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कच - देवयानी प्रणयाराधनातून निर्माण होणारा शृंगाररस, कचाची ध्येयवादी कार्यनिष्ठा, देवयानीचे कचावरील अत्युत्कट प्रेम देव-दानवांच्या मधील वैमनस्ये गौण पात्रांच्या मदतीने हास्यरसाची निर्मिती, शुक्राचार्यांची भक्कम तात्त्विक अधिष्ठानावर उभी असलेली व्यक्तिरेखा, इत्यादी सर्व गोष्टींबरोबरच शुक्राचार्यांचे अतिरेकी मद्य- पानाचे व्यसन, त्यातून निर्माण झालेला मदिरा संप्रदाय आणि शेवटी asar अध:पतनाने त्यांनी केलेला मद्यपानाचा निषेध, या गोष्टींना 'विद्याहरणात विशेष महत्त्व आले आहे त्यासाठीच शुक्राचार्यांची नाटकाच्या अखेरीस एकच प्याल्यातील सुधाकराप्रमाणेच, मद्यपानाच्या धिक्काराची प्रदीर्घ स्वगते आली आहेत. प्रचारकी थाटाचा आविर्भाव येथे व्यक्त होत असला तरी खाडिलकरांच्या व्यक्तिचित्रणातील सामर्थ्याने आणि घटना प्रसंगांच्या जुळणीतील कौशल्याने त्याला केवळ प्रचारांचे स्वरूप न राहता ते त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे स्वाभाविक अंग बनत जाते व त्याला कलात्मक चित्रणाची पातळी लाभते. 'युवराज' 'मधुकर' ही काल्पनिक व्यक्ति- चित्रणे एकच प्याल्यातील तळिरामादि 'आर्य मदिरा मंडळा' सारखीच मद्यपानाच्या दुष्परिणामांचे चित्र रेखाटण्यासाठी आहेत शुक्राचार्यांचा एक महत्त्वाचा डाव आहे. त्यांना कचाला आपल्या मद्यपानपंथात सामील करुन घ्यावयाचे आहे. त्यासाठी ते प्रतिज्ञापूर्वक प्रयत्न करतात. खाडिलकरांनी केलेली मदिरा संप्रदायाची निर्मिती, महाभारतातील शुक्राचार्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक व्यापक करते. त्यांच्या व्यक्तित्वाचे विश्लेषण करते. मूळ उपाख्यानातील शुक्राचार्यांची व्यक्तिरेखा तिचा कल आणि तोल लक्षात घेऊन विकसित होते आणि शुक्राचार्यांचा नवा अवतार घडतो. खाडिलकरांची नवनिर्मिती:- कचाला आपल्या मद्यसंप्रदायात ओढण्याचा शुक्राचार्यांचा डाव मूळ उपाख्यानात नाही. खाडिलकरांनी नव्याने ही कल्पना मांडली आहे. खरे तर शुक्राचार्यांना कचाला आपल्या आश्रमातून घालवून ८...