पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खांडेकरांची 'ययाती' ही कादंबरी जशी आपल्या काळात प्रभावी ठरली. नवीन परंपरा निर्माण करु शकली तशाच प्रकारे खाडिलकरांची. 'कीचक वध' आणि 'विद्याहरण' ही दोन नाटके. १९०० ते १९२५ या कालखडावर आपला विशेष ठसा उमटविणारी झाली आहेत. स्वतःला अभिप्रेत असलेल्या मद्यपान निषेध विषयानुकूल महा- भारत कथा बनविण्याच्या खाडिलकरांच्या प्रयत्नामुळे. या उपाख्यानातील शुक्राचार्यांच्या व्यक्तिरेषेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महा- भारतातील कचोपाख्यानात कचाचे विद्याहरण महत्त्वाचे आहे. महाभारतात एवढ्या ठळकपणाने शुक्राचार्य या कथाभागात येत नाहीत. शिवाय कृ. ह. दीक्षितांचे 'विद्याहरण अर्थात विद्यासाधन', शा. रा. वंदे यांचे 'सं. संजीवनी' मामा वरेरकरांचे 'संजीवनी' ही नाटके म्हणजे 'विद्याहरणाची प्रभावळ' आहे. स्वतः नाटककारांनी या गोष्टीची कबुली दिलेली आहे. कचोपाख्यान मराठीमध्ये रुजविण्याचे श्रेयः खाडिलकरांच्या विद्याहरणाचे आहे आणि ययाती उपाख्यान मराठी मनात विशेष रुजविण्याचे श्रेय भाऊसाहेब खांडेकरांच्या 'ययाती " कादंबरीचे आहे. कलाबाह्य रंजनाची किंवा प्रचाराची प्रेरणा ज्या साहित्यकृतीची असते त्या सामान्य कृती ठरतात. पण खाडिलकरांच्या प्रतिभेत रंजन आणि उद्बोधन असूनही कलात्मकतेचा स्पर्श नाट्य- कृतींना देण्याचे सामर्थ्य आहे. मदिरा संप्रदाय : शुक्राचार्यांचा नवा अवतारः- खाडिलकरांनी विद्याहरण नाटकांत मदिरापानाचे स्तोम अगदी नाटकाच्या आरंभापासून वर्णिले आहे. देवयानी सरस्वतीच्या रूपात सून बसली असून तिला मदिरेचा नैवेद्य दाखविण्याचा आग्रह तिच्या ' सख्या, दासीजन करीत आहेत. असा नाटकाच्या प्रारंभीचा देखावा आहे. यावरुन कल्पना येते की, या नाटकांत मद्यपानाच्या प्रश्नाला महत्त्व आहे. म्हणूनच खाडिलकर नाटयारंभापासून आपले लक्ष त्यावर केंद्रित करतात. हे मंदिरासक्तीचे चित्र मुळीच नाही. खाडिलकरांच्या नाटय रचनाकौशल्याची ही सारी किमया आहे. ... ७