पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असे म्हटलेले आहे. पौराणिक नाट्यलेखनात खाडिलकर सिद्धहस्त लेखक आहेत. पुराणाने पुरविलेला महत्त्वाचा तपशील ते कायम ठेवून आपल्याला अभिप्रेत असलेले विचारनाट्य कलात्मकतेने गुंफतातः नाटकाच्या मुळाशी त्यांचे राजकीय तत्त्वचितकाचे व्यक्तिमत्त्व उभे आहे. प्रस्तुत विद्याहरण नाटकातही 'मद्यपान निषेध' करणारे विचार- नाट्य ते शुक्राचार्यांच्या व त्यांच्या मद्यपान संप्रदायाच्या अधःपातातून सूचित करतात. महाभारताचे उपाख्यान आणखी एका दृष्टीने त्यांना उपयुक्त वाटते 'शिवाय मद्यपानाविषयी तिटकारा उत्पन्न करून मद्यपानः निषेधाच्या विषयाची नाट्यसृष्टीने पूर्तता व्हावी म्हणून मद्याधीन 'शिष्यवरा' चे हास्यरसांची जोड. पौराणिक पात्रांना द्यावी लागली. ' कृ. प्र. खाडिलकरांनी महाभारताच्या वाढीच्या प्रक्रियेला ललित लेखकांचा कसा हातभार लागतो, नव्या आविष्कारांनी महाभारत कसे वाढते आहे, याचा निर्वाळा या नाटकाच्या निमित्ताने केलेल्या विधानातून दिला आहे. 'विद्याहरणा' ची ही कथा नीट समजण्याकरिता व यांतील रसाचा परिपाक होण्याकरिता साखळीतील निरनिराळया दृष्यांना योग्य वळण द्यावे लागले. ( प्रस्तावना ) q... " " महाभारतातील 'कच - देवयानी' आख्यानांत शिष्ट संमत फेरफार करुन हे नाटक लिहिले आहे. शुक्राचार्यांना स्वतःचे शिष्यवृंदाबद्दल व सांप्रदायाबद्दल अपत्य स्नेहाचे तोडीचा अभिमान वाटत होता, आणि त्यांचा शिष्यवृंद स्वहिताविषयी नेहमी दक्ष होता. अशा अभिमानाच्या व दक्षतेच्या तटबंदीत कोंडून ठेवलेली संजीवनी विद्या देवांच्या बाजूला कशी गेली? या विद्येचे हरण करितांना कचाचे कार्य निष्ठेला देवयानीच्या दिव्य प्रेमाची मदत मिळाली: दैत्यांच्या फाजील दक्षतेतील अविचाराचा पाठींबा मिळाला व आचार्यांच्या सुरापानाचे व्यसनामुळे तटबंदीचे दरवाजे खुले झाले. " सं. विद्याहरण (नाटक) कृ. प्र. खाडिलकर क्षा: ८ वी, १९७२- ( प्रस्तावना पु. नाही. )