पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

4 नाटक लिहिले आहे कचदेवयानी उपाख्यान मराठीमध्ये नाट्यरूपाने सांगण्याचे कार्य या दोन्ही नाटकांनी नेटकेपणाने केले आहे. पण सामान्य प्रतीची ही नाट्यनिर्मिती असल्याचा अभिप्राय डॉ. वि. पां. दांडेकर यांनी आपल्या पौराणिक नाटके या प्रबंधात दिला आहे. अशाच प्रकारचे एक सामान्य दर्जाचे नाटक म्हणून श्री. भि. ग. आठवले यांच्या 'सं. देवयानी पाणिग्रहण " या नाटकाचीही नोंद याच ठिकाणी केली पाहिजे. या तिन्ही नाटकांची या विषयावरील पौराणिक नाटके म्हणून दखल घेण्यापलीकडे फारसे वैशिष्ट्य त्यात नाही. नाट्याचार्य खाडिलकरांचे सं. विद्याहरण :-- कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी १९१३ साली महाभारतातील कचोपाख्यानावर 'सं. विद्याहरण' नाटक लिहिले. या नाटकाच्या नावाप्रमाणे खाडिलकरांना कचाने शुक्राचार्यांकडून केलेल्या संजीवनी विद्येच्या प्राप्तीपर्यंतचे कथानक नाट्यरूपात सादर करावयाचे आहे. खाडिलकर विचारप्रधान नाटके लिहितात. त्यांच्या 'कीचक वध ' नाटकातील विचारनाट्य फार प्रभावी आहे. पौराणिक कथाभाग घेऊन त्यात काही ' शिष्टसंमत' ( तेवढेच ) फेरफार ते करतात आणि आपल्याला हवा तो परिणाम नाट्यमाध्यमातून साधतात. शिष्ट संमत फेरफार : खाडिलकरांनी विद्याहरणाच्या प्रस्तावनेत आपण महाभारतातील आदिपर्वात आलेल्या कचोपाख्यानात 'शिष्ट संमत' फेरफार करीत आहोत

  • 'अगदी सुरुवातीच्याच नटी सूत्रधारांच्या प्रवेशातच कच देवयानीचा संबंध विकल होणार अशी सूचना जी नाटककाराने दिलेली आहे ती विशेष कौशल्यपूर्ण वाटते. पण कथानकाची रचना वा पात्रांचा स्वभाव- परिपोष इत्यादी दृष्टींनी हे नाटक एक विशेष लक्षात घेण्याजोगे ठरणार नाही.

(पौराणिक नाटके : डॉ. वि. पां. दांडेकर, पु. २४६-४७) 8 या नाटकाचा लेखनकाल १८९६ आहे.