पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कन्या देवयानी कशी लाभली हा प्रश्न जनमेजयाने विचारला. त्यासाठी ययाती उपाख्यान महाभारतात आले आहे.' देवयानीची कथा कचाशी निगडित असल्यामुळे कचोपाख्यान ओघात आले आहे. येथे कच, ययाती, देवयानी, शर्मिष्ठा, शुक्राचार्य, पुरु या व्यक्तींच्या जीवनातील घटनांनी सांधलेले कथानक त्यांच्या नातेसंबंधांवर प्रकाश टाकते. साहित्यिकांनी जरी ययातीचे वार्धक्य पुरु घेतो एवढा कथाभाग स्वीकारला असला तरी महाभारतात हे उपाख्यान आणखी पुढे आहेच ! त्यात ययाती स्वर्गात गेला, तेथून खाली येत असतांना त्याचा अष्टक, • वसुमान, शिवि प्रभृतींशी जो संवाद झाला तो 'उत्तरयायात ' भाग म्हणून येतो. या संवादानंतर ययाती स्वर्गात जातो, अशी कथा पुढे आहे. शुक्राचार्य, तृषपर्वा, कच, देवयानी, शर्मिष्ठा, ययाती, यदु पुरु या व्यक्तींचे जीवन व स्वभाव न्याहाळले म्हणजे या कथानकातील नाट्यमयता ( Dramatic Element ) जाणवते. रंजन- प्रबोधनप्रेरणेतून, अर्वाचीन मराठी साहित्याच्या आरंभीच्या ( १८०० ते १८८५ पर्यंतच्या) कालखंडात ललितसाहित्य निर्माण झाले आहे. त्यातनाट्य- लेखनाकडे साहित्यिकांचा विशेष ओढा दिसून येतो. 'ययाती - कचोपाख्यान' नाट्यलेखनासाठीच या कालखंडात निवडल्याचे आढळते. कचोपाख्यानावरील नाटके- इ. स. १८८१ ते १८९० या कालखंडातील किर्लोस्कर संगीत नाटकाच्या प्रभावाने या उपाख्यानावर नाटयलेखन झाले आहे. स. बा. सरनाईक यांचे सं. कचदेवयानी हे नाटक इ. स. १८८७ मध्ये प्रसिद्ध झाले. ३ श्री. वि. भि. कापरेकर यांनी १८९२ मध्ये 'कचदेवयानी' 2 महाभारत आदिपर्व (संभवपर्व) अध्याय ७५ ते ९३. * 3 ' कथानकाची रचना बऱ्यापैकी असून, देवयानी, कच, शुक्राचार्य यांच्या स्वभावाचा परिपोष यांत चांगला साधला आहे. अत्यंत साध्या व सोप्या भाषेत सुटसुटीत संवादात हे पौराणिक कथानक त्यांनी व्यक्त केले आहे.' (पौराणिक नाटके : वि. पां. दांडेकर, पृ. २३४ )