पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३) मराठी प्रतिभावंतांनी शोकनाट्याचा नायक म्हणून कर्णाकडे पाहिले आहे. पहिला पांडव, टाकलेलं पोर, कौंतेय, कर्णायन, मृत्युंजय, राधेय, सूर्यपुत्र इत्यादी साहित्यकृतीत सामाजिक, राजकीय परिस्थितीच्या संदर्भात कर्णाचे चित्रण रेखाटले असून त्यातील कौंतेय, राधेय या- सारख्या साहित्यकृतींमध्ये कलात्मक अभिव्यक्ती आढळते. कर्णाच्या निमित्ताने महाभारताचे पुनर्मथन व मानवी मनाचे कलात्मक चिंतन आविष्कृत झाले आहे. हिऱ्याचे पैलू पाहावे तसे कर्णाच्या जीवनाचे नवे पैलू प्रकाशात आणले आहेंत. त्याचे अंतरंग जाणून घेऊन 'माणूस' म्हणून चित्र रेखाटले आहे, महाभारताचे हें वर्धिष्णू रूप हेरून त्यात नवी भर घातली आहे हे मराठी साहित्यातील कर्णाच्या चित्रणावरून दिसून येते. मात्र अद्याप महाभारतातील पुष्कळच व्यक्तिरेखा आणि कथाभाग अस्पर्शित राहिला आहे कुंती, गांधारी, भी म, विदुर, अश्व- त्थामा या व्यक्तिरेखा आणि दुष्यन्त, शकुंतला, सावित्री इत्यादी उपाख्याने व अंवा कथा ही याची उदाहरणे म्हणून सांगता येतील. २४) यावरून साहित्यिकांच्या व्यक्तित्वाला व बदलत्या परि--, स्थितीला अनुसरून सतत वाढण्याची महाभारताची प्रवृत्ती सिद्ध होते. महाभारतातील व्यक्तींचे पारदर्शक व बहुमिती व्यक्तिमत्त्व, भावो- त्कटता, संघर्ष व चैतन्य इत्यादी नवनिर्मितीच्या विविध प्रेरणा देण्याचे सामर्थ्य आढळते. महाभारत एक जिवंत, वर्धिष्णू व उपजीव्य महाकाव्य ठरले आहे. भविष्यकाळातही तत्कालीन परिस्थितीला आवश्यक अशा प्रेरणा महाभारतातून मिळून ते सतत वाढतच राहील. १०४