पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ई) घटनांचा तपशील :- महाभारतातील घटनेत नवे नवे रंग भरले आहेत. उदा- हरणार्थ, विद्याधर पुंडलिकांच्या 'माता द्रौपदी' मध्ये अश्वत्थामा आणि द्रौपदी ह्यांची झालेली गाठ. ही घटनांच्या तपशिलातील नवी भर आहे. उ· ) रस - निर्मिती :- 'अश्वत्थाम्याचा छापा' व 'अश्वत्थाम्याचे पारिपत्य ' या नाटकामध्ये बीभत्स व भयानक रसांची निर्मिती झालेली आहे ऊ) कल्पकता :- fa. वा शिरवाडकरांच्या 'ययाती आणि देवयानी' नाटकातील तिसन्या अंकात देवयानीच ययातीला वार्धक्याचा शाप नृत्य प्रसंगाच्या निमित्ताने देते. महाभारतातील व्यक्ती, वातावरण, प्रसंग, याची कालोचित जाण आणि आगळेपणाचे भाव ठेवून त्याला मराठी प्रतिभावंतांनी आपल्या प्रतिभेचा स्पर्श केला आहे. २२) महाभारतावर आधारित ललित साहित्याची निर्मिती हा पलायनवाद नाही 'सामाजिका 'चा पट कमी पडतो म्हणून त्याकडे पाठ फिरविणेही नाही, तर वर्तमानकाळातील समस्या आणि व्यक्तीचे स्वभाव यांची पाळेमुळे महाभारतात खोलवर रुजलेली आहेत. विचार, विकार, भावना आणि वासना यांचे सार्वकालीन प्रतिबिंब महाभारतात उमटलेले आहे. द्रौपदीसारख्या लावण्यवतीला आपल्या स्त्रीत्वाला जपावे लागते हे कोणत्याही काळातील स्त्रीच्या संदर्भात म्हणता येईल. साहित्यिकांनी पुराणकाळ आणि वर्तमानकाळ ह्यांतील अनुभवविश्व एकाच वेळी साकार केले आहे. ' कीचकवध', 'विद्याहरण', 'ययाती', 'चक्र' या साहित्य कृतीतून वर्तमान जीवननिष्ठा प्रत्ययाला येतात. म्हणूनच महाभारत एक सांस्कृतिक पुराणकथा म्हणून मराठी ललित साहित्याचे प्रेरणा-स्थान झाले आहे. .. १०३