पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाभारतकाराने व्यक्ती गुणदोषांनी युक्त व मानवी पातळीवरून चित्रित केल्या आहेत. या व्यक्तींच्या महाभारतात रेखाटलेल्या जीवनात प्रखर नाट्य व शोकानुभावाचा प्रत्यय येतो. तसेच महाभारतातील व्यक्ती- मध्ये चिरंतर मानवी मनातील भावभावनांचे चिंतन केलेले आहे. कारण महाभारतकाराने चार पुरुषार्थापैकी मोक्षाला महत्त्व दिले आहे. यावरून महाभारताला आध्यात्मिक बैठक आहे व त्याकडेच व्यक्तीला नेण्याचा प्रयत्न आहे. या व्यक्तींच्या चित्रणामागील चिंतन महत्त्वाचे आहे, म्हणून महाभारताचे आवाहन सतत वाढणारे आहे. इहतत्त्वाचा अंश परतत्वा- - पेक्षा या व्यक्तींच्या मध्ये अधिक असून अद्भुताच्या आधाराने त्या अवतरल्या आहेत. २१) महाभारताचा नवा आविष्कार करताना मराठी साहित्यि- कांनी पुढील स्वतंत्र गोटींची नव्याने जोड दिली आहे व त्यांच्या साहित्यकृतींनी महाभारतात नवी भर टाकली आहे. १०२ अ) नवे चितन:- 'ययाती' कादंबरीतील ययाती दोन महायुद्धानंतरच्या खांडेकरांच्या सखोल व नव्या चिंतनातून अवतरला आहे. महाभारतातील ययातीप्रमाणे हा केवळ कामी नसून सर्व प्रकारच्या सुखलोलुपतेची हाव धरणाऱ्या माणसांचा प्रतिनिधी झाला आहे. आ) प्रसंग-निर्मिती याचे ठळक उदाहरण म्हणजे वि. वा. शिरवाडकर ह्यांच्या 'कौंतेय' नाटकातील कर्ण आणि कुंती यांच्या भेटीचा प्रसंग व त्यातून उमटलेले उत्कट भावनाट्य हे सांगता येईल. इ) पूरक व्यक्तिरेखा:- शिवाजी सावंताच्या 'मृत्युंजय' कादंबरीतील कर्णाचा धाकटा भाऊ ' शोण', पत्नी ' वृषाली' किंवा रणजित देसाई ह्यांच्या 'राधेय' कादंबरीतील 'चक्रधर' या कल्पित व्यक्तींची भर कर्णकथेत पडलेली आहे.