पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काव्यात्म न्याय पाळणे, कलांतर्गत सुसंगती राखणे त्याला आवश्यक असते. साहित्यकृतीत या अपेक्षा पूर्ण करण्याचे सामर्थ्य आहे की नाही . तेच फक्त पाहिले पाहिजे. कापडावरील भरतकामाचे सौंदर्यग्रहण कर- ण्याची आपली क्षमता असावी. त्यामागील वाजू पाहण्याचा प्रयत्न केल्याने सौंदर्य प्रचीती होणार नाही. हीच गोष्ट ललित साहित्यातील सौंदर्याचा आस्वाद घेतानाही लक्षात घ्यावी लागते, महाभारतात जीवनातील सत्याचे आणि सौंदर्याचे दर्शन घडते. सत्य कल्पिताच्या पातळीवरून अभिव्यक्त झाले की कलात्मक पातळी गाठते. वि वा शिरवाडकर, शिवाजी सावत, रणजित देसाई यांचा 'कर्ण' विद्याधर पुंडलिकांचा 'अश्वत्थामा' यांच्याकडे या दृष्टीने पाहिले पाहिजे दुर्गा भागवतांनीही महाभारतकारांची सौंदर्यदृष्टी आणि कलागुणांचा शोध घेण्याचा केलेला प्रयत्न असाच समजावून घेतला पाहिजे. १९) इतिहास, पुराणकथा आणि महाकाव्य यामुळे महाभारताचे स्वरूप व्यामिश्र झाले आहे. महाभारत अनेक संस्करणांतून विविध काळात एखाद्या लोककथेसारखी वाटचाल करीत आहे. समाजाच्या प्रगल्भ आणि अप्रगल्भ अशा सर्व स्तरातून ते प्रवाहित झाले आहे. महाभारताच्या या स्वरूपामुळे साहित्यिकांच्या बहुविध जाणिवांना अवसर मिळाला आहे. कोश स्वरूपाच्या साहित्यात नेहमीच नव्या आकलनाला आणि संशो- धनाला अधिक वाव मिळतो. महाभारतात ही सर्वसमावेशकता आहे. महाभारत ही जणू काही विद्युतशक्ती असून ती अनेक साहित्यिकरूपी विद्युत्द्दीपांमधून प्रवाहित झाली आहे. साहित्यिकांच्या प्रतिभेने ही अनेकरंगी इंद्रधनुष्ये महाभारतातूनच निर्माण झाली आहेत. साहित्यिकांनी या महाकाव्याला नवसंजीवन प्राप्त करून दिले आहे. त्यांनी घडविलेले हे नवे रूपदर्शन म्हणजेच महाभारताची झालेली वाढ आहे. २०) प्रत्येकावर शोकात्म अनुभूतीचा प्रभाव पडत असतो. भारत हे तर शोकानुभूतीचा प्रत्यय देणारेच महाकाव्य आहे. महा- गांधारी, कुंती, द्रौपदी, धृतराष्ट्र, विदुर, कर्ण, अश्वत्थामा, एक- लव्य या सगळ्या व्यक्तींचे जीवन कारुण्याने भरलेले आहे. याचे कारण ... १०१