पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

युगांत, कल्पवृक्ष या साहित्यावरूनही हेच दिसून येते. आपल्या दृष्टि- 'कोनातून विशिष्ट व्यक्तींवर, प्रसंगांवरही लिहिण्याची प्रवृत्ती आढळते. वि. वा. शिरवाडकर कौंतेयमध्ये कर्ण कुंती संवादाचा, त्यांच्या भेटीचा प्रसंग निवडतात तर शिवाजी सावत कर्णावरच आपले लक्ष केंद्रित करतात. समाजकारण, राजकारण व तत्त्वज्ञान यांचे चिंतन करण्यासाठी आणि आपल्या आवडीच्या गोष्टींचे समर्थन करण्यासाठी महाभारताचे माध्यम साहित्यिकांना उपयुक्त ठरले आहे. साधन म्हणून महाभारताकडे पाहिल्यामुळे निश्चितपणे महाभारताच्या कक्षा वाढल्या पण त्यामुळे त्यातील काव्यात्म भाव झाकाळले याची खंत दुर्गा भागवतांनी व्यक्त केली आहे ' व्यापपर्वा'त सतत व्यासांच्या कलेचे भान राखण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. इरावती कर्वे 'युगान्त'मध्ये समाजशास्त्रीय दृष्टिकोन व्यक्त 'करतात आणि कलात्मक पातळीही गाठतात. त्यातील सामाजिक चिंतन आणि लालित्य परम्परात अतूटपणे मिसळलेले आहेत. 'प्रत्येकाच्या मनात दडलेले ' आणि जीवनाशी निगडित असलेले अनुभव आपल्या प्रतीतीनुसार साहित्यिकांनी व्यक्त केले आहेत. त्यांना जाणवलेल्या महाभारतातील व्यक्ती, घटना व प्रसंग नाटक, कादंवरी, काव्य या वाङमयप्रकारांच्या माध्यमातून ते व्यक्त करतात. वि वा. शिरवाडकर 'कौंतेय' व 'ययाती आणि देवयानी', वि. स. खांडेकर 'ययाती', शिवाजी सावंत 'मृत्युंजय', रणजित देसाई 'राधेय', विद्याधर पुंडलिक 'चक्र' इत्यादी साहित्यिकांच्या साहित्या - वरून हे दिसून येते. परंपरेने आपल्या स्वाधीन केलेल्या महाभारताचे हे नवे रूपदर्शन आहे. त्यांच्या प्रतिभेने फुलविलेली ही नवी निर्मिती मातीतून उगवणाऱ्या लसलशीत रोपट्यांसारखी चैतन्यमय आहे. एखाद्या वृक्षाला नवी पालवी फुटावी तशी महाभारते या 'कल्पवृक्षाला ' फुटलेली ही नवी पालवी आहे. प्रतिभेच्या द्वारा घडणारे हे महाभारताचे रूपदर्शन मुळापेक्षा वेगळे असणेच स्वाभाविक आहे. १००. १८) कलावंत काव्यात्मक - अनुभवाची अभिव्यक्ती करीत असतो.