पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असे अर्थ शोधले आहेत. नवी संगती लावली आहे. साहित्यिकांना महा- भारताचे आकर्षण कायम वाटत राहणार आहे हेही या साहित्यातून सूचित होते. १५) स्थल, काल आणि व्यक्ती याला अनुसरून महाभारत वाढले. महाकाव्याची ती प्रवृत्तीच आहे. म्हणूनच महाभारताला वर्धिष्णू महाकाव्य आणि जिवंत महाकाव्य म्हटले आहे. मराठी प्रतिभावंतांचे ते एक प्रेरणास्थान आहे. अनेकविध साहित्यकृतींच्या विवेचनातून हे स्पष्ट झाले आहे. महाभारताच्या नव्या नव्या आविष्काराची ही प्रक्रिया कधीच थांवणारी नाही. कारण महाभारताचे आवाहन फार जवरदस्त आहे. मराठी प्रतिभेला ते अखंड राहणार आहे. असे दिसून येते. कलावंतांच्या महाभारतावरील भाष्याने महाभारतात नवी भर पडलेली दिसते. म्हणूनच त्यांची लाक्षणिक अर्थाने वाढ होते व अनेक साहित्यिक रूपी विहंगांना भरविणारा तो एक 'कल्पवृक्ष आहे हे लक्षात येते. १६) महाभारतातील व्यक्ती चैतन्यपूर्ण आहेत, मानवी पातळी- वरील आहेत. त्यांची जीवनातील सत्यांशी नाती आहेत. माणसाच्या माणूसपणाचे दर्शन त्या घडवितात. त्यांचे वावरणेही स्वाभाविक वाटते. असे असूनही या व्यक्तींच्या मध्ये गुणदोषावरोवरच एकेका वैशिष्ट्यपूर्ण गुणाचे आधिक्य आहे. भीष्म प्रतिज्ञेचा, धर्म सत्याचा, कर्णं दातृत्वाचा, एकलव्य गुरूभक्तीचा, भीम सामर्थ्याचा, अर्जुन शौर्याचा, कृष्ण मुत्सद्दी - पणाचा, अश्वत्थामा क्रौर्याचा, उत्कर्ष आहे असे म्हणता येईल. माणसाने जीवन जगावे कसे आणि संपवावे कसे है या व्यक्तींच्या जीवनातून स्पष्ट होते. या बाबतीत महाभारत वास्तववादी आहे. आदर्शवादी कमी आहे. १७). महाभारतातील व्यक्तींकडेच प्रामुख्याने साहित्यिकांचे लक्ष वेधले गेले हे. व्यक्तिप्रधान मराठी साहित्यावरूनही स्पष्ट होते. काही लेखकांनी मात्र संपूर्ण महाभारताचा पट आपल्यासमोर ठेवला आहे. बाळशास्त्री हरदास, शं. के. पेंडसे, आनंद साधले, म. रं. शिरवाडकर इत्यादी साहित्यिकांनी असे चिंतन केले आहे. व्यासपर्व, ... ९९