पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्राप्त करून दिले आहे. अश्वत्थाम्याच्या चिरंजीवित्वाचे चिरंतन दुःख दुर्गा भागवत, मधू भोसले, विद्याधर पुंडलिक यांनी असेच व्यक्त केले आहे. हे साम्य जसे आढळते त्यापेक्षाही एकाच व्यक्तीच्या आणि प्रसंगाच्या चित्रणात पृथगात्मता आढळते यांचे उदाहरण म्हणून भिन्न साहित्यिकांनी रेखाटलेलें कर्णांचे जीवन सांगता येईल. १३) कोणत्याही पौराणिक साहित्यकृतीत कल्पकतेवर विशेष भर असणे स्वाभाविक आहे. ऐतिहासिक साहित्यकृतीच्या निर्मितीसाठी निदान काही बाह्य साधने ( कागदपत्रे, दप्तर, वाड इत्यादी ) तरी उपलब्ध असतात. ललित साहित्यात पौराणिक साहित्याची एकदा गणना केल्या- नंतर मग साहित्यिकाला कथेची कलात्मक बांधणी करण्याची, व्यक्तींच्या मनाचा व जीवनाचा शोध घेण्याचा व नवा तपशील कथेत भरण्याची मुभा असते. साहित्यिकाच्या भावनात्मक प्रत्ययालाच शेवटी येथेही महत्त्व प्राप्त होते. माणसाचे प्रत्ययकारी चित्रण घडविण्यांचे सामर्थ्य पौराणिक ललित साहित्यकृतीत असते म्हणून अशा साहित्याला वाङ्मयीन मूल्य लाभते, या संदर्भात इरावती कर्वे यांनी स्वर्गारोहणपर्वाच्या कथाभागाला आपल्या प्रतिभेचा केलेला स्पर्श पाहिला म्हणजे पौराणिक कथेला कलावंताच्या भावनिक प्रत्ययाची लाभणारी ओढ दिसून येते. इरावती कर्वे यांनी चित्रित केलेल्या या प्रसंगातून भीमाला द्रौपदीविषयी वाटणारी ओढ नव्यानेच व्यक्त होते. रणजित देसाई यांच्या 'राधेय' कादंबरीचा अंतःकरणाला पाझर फोडणारा शेवट, विद्याधर पुंडलिकांच्या माता द्रौपदी' तील अश्वत्थामा आणि द्रौपदी यांच्यातील संभाषण या उदा- हरणांतून मराठी प्रतिभावंतांच्या कलात्मक आविष्काराची जाणीव होते. १४) मोठ्या आत्मविश्वासाने साहित्यिकांनी कलात्मक आविष्कार केले आहेत. उदाहरण म्हणून रणजित देसाई यांच्या 'राधेय' कादं- बरीची, प्रस्तावना पाहिली म्हणजे याची कल्पना येते याही अगोदर शिरवाडकरांच्या 'ययाती आणि देवयानी' नाटकाच्या प्रस्तावनेत हा आविष्कार प्रगट झाला आहे. आपल्यापरीने साहित्यिकांनी महाभारतातून ९८ ..