पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०) रसिक, साहित्यिक आणि समीक्षक यांचे महाभारताकडे पाहण्याचे दोन स्वतंत्र दृष्टिकोन आढळतात अ) महाभारतनिष्ठ परंपरावादी दृष्टिकोन. ब) लेखन - स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा दृष्टिकोन. या दोन गटांत मराठी साहित्य विभागले गेले आहे. ह्यापैकी कालिदास, भवभूती, भास इत्यादी श्रेष्ठ लेखकांनी दिलेल्या स्वातंत्र्याच्या सनदीचा हक्क बजावणारे ललित साहित्यिक संख्येने अधिक आहेत. त्यांनी कसदार व कलात्मक साहित्यकृतींची निर्मिती केलेली आहे. ११) महाभारताचा आधार अनेक साहित्यिकांनी घेतला असला तरी प्रत्येकाची दिशा आणि वाट वेगळी आहे. मौजेची गोष्ट अशी की सामान्य रसिक वाचकात महाभारतातील ठळक, ज्ञात गोष्टींविषयी एकवाक्यता आढळते पण विचारवंतांच्या आणि कलावंतांच्या चिंतनात भिन्नता प्रत्ययाला येते. कर्ण दानशूर होता हे सर्वसामान्यापर्यंत जाऊन पोहचलेले एक ज्ञात सत्य आहे. पण त्याच्या दातृत्वात हेतू होता, सौंदर्याचा वर मागून व वासवीशक्ती वेऊन त्याने कवचकुंडलाचे दान केले, त्यामध्ये त्याची कीर्तीची हाव दिसते अशी भिन्न मते विचारवंत व कलावंतांनी व्यक्त केली आहेत. १२) काही वेळा कलावंत मनाच्या समान प्रतिक्रिया महाभारताच्या चिंतनातून व्यक्त होतात. उदाहरणार्थ इरावती कर्वे यांच्या 'युगांत ' मध्ये आणि विद्याधर पुंडलिक यांच्या 'माता द्रौपदी' मध्ये भीम आणि द्रौपदी यांच्या संबंधाकडे समान भावनेने पाहिलेले आढळते. दोघांनाही भीमाचे द्रौपदीवर अलोट प्रेम होते हे जाणवले आहे. द्रौपदीकडून या प्रेमाला विशेष प्रतिसाद मिळू शकला नाही हेही त्यांनी व्यक्त केले आहे. हाच अनुभव दुर्गा भागवत आणि आनद साधले यांची कृष्ण व द्रौपदी यांच्या नात्याविषयी केलेल्या नव्या चिंतनातून प्रत्ययाला येतो. कृष्ण आणि द्रौपदी यांच्या सख्यत्वाला अशरीरिणी व अनामिक प्रेमाचे रूप त्यांनी 'कामिनी द्रौपदी' व्यासपर्व आणि हा जय नावाचा इतिहास आहे यात ९७